खेळपट्टीवरील गवतामुळे फसणार नाही- मार्कस हॅरिस

मेलबर्न: ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मार्कस हॅरिसने मेलबर्न खेळपट्टीची पाहणी केल्यावर सांगितले की, खेळपट्टीवर भरपुर प्रमाणात गवत आहे. त्यामुळे ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करू शकते. परंतु, या मैदानावर खेळण्याचा अनुभव असून जर संयमाने फलंदाजी केली, तर ही खेळपट्टी फलंदाजांना देखिल मदतगार आहे. त्यामुळे खेळपट्टीच्या दिखाऊपणाने मी फसनार नाही.

या मैदानाबाबत बोलताना तो म्हणाला, स्थानिक सामन्यातील एका सामन्यात मी या मैदानाची पाहणे केली होती. त्यानंतर खेळपट्टी वरील गवत पाहून मला वाटले की, हा सामना दीड दिवसात संपेल. त्यामुळे स्वतःवर दडपण न घेता खेळ केला आणि या सामन्यात द्विशतक ठोकले. मेलबर्नच्या मैदानावर संयमाने फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाला या खेळपट्टीने नेहमी साथ दिली आहे. पण, जर तुम्ही अचूक ठिकाणी गोलंदाजी केली तर तुम्हाला बळी देखील मिळतील. हिरवळ असुनही ही खेळपट्‌टी बऱ्याचदा संथच असते, असेही हॅरिस म्हणाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)