खेळपट्टीचा अंदाज घेण्यात चूक झाल्याने पराभव – विराट कोहली 

बंगळुरू- येथील चिन्नास्वामी मैदानात रंगलेल्या सामन्यात राजस्थानने चालू हंगामातील सर्वाधिक धावसंख्या उभारताना बंगळुरूचा 19 धावांनी पराभव केला. या सामन्यातील बंगळुरूचा पराभव खेळपट्टीबाबतचा अंदाज चुकल्याने झाला असल्याची प्रतिक्रिया कर्णधार विराट कोहलीने मुंबईविरुद्धच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्‍त केली. विराट म्हणाला की, आजच्या सामन्यापूर्वी आम्हाला खेळपट्टी गोलंदाजांना साथ देणारी, तसेच फलंदाजाच्या बॅटवर सहजासहजी चेंडू येऊ न देणारी असेल असे वाटले होते. मात्र प्रत्यक्षात सामन्यात खेळपट्टीही फलंदाजांसाठी पोषक निघाली. त्यामुळे चेंडू सहज फलंदाजांच्या बॅटवर येत असल्याने राजस्थानच्या फलंदाजांना धावा काढण्यात कोणतीही अडचण आली नाही. त्यामुळे आम्हाला पराभवाला सामोरे जावे लागले.

त्याच बरोबर आयपीएलच्या अकराव्या मोसमात आतापर्यंत बंगळुरूच्या गोलंदाजांनी केलेल्या निराशाजनक कामगिरीबाबत बोलत असताना कोहलीने आपल्या गोलंदाजांची पाठराखण केली. आमच्या गोलंदाजांनी पंजाबच्या फलंदाजांना बांधून ठेवल्याने आम्हाला त्या सामन्यात विजय मिळवण्यात यश आले. त्यामुळे आमच्या ोगलंदाजांना दोष देता येणार नाही, असेही त्याने सांगितले. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात ख्रिस व्होक्‍स आणि उमेश यादव हे दोघेही आघाडीचे गोलंदाज अपेक्षित कामगिरी करु शकले नाहीत. याबाबत बोलताना कोहली म्हणाला की, प्रत्येकासाठी एखादा दिवस वाईट असतो तसेच या दोघांच्या बाबतीत झाले. त्यांनी सामन्यात आपल्याकडून बळी मिळवण्याचा आणि धावा न देण्याचा कसून प्रयत्न केला. परंतु खेळपट्टी गोलंदाजांसाठी पोषक नसल्याने त्यांचा प्रभाव पडला नाही. ज्याप्रमाणे आमची गोलंदाजी निष्प्रभ ठरली, त्याचप्रमाणे राजस्थानच्या गोलंदाजांनीही भरपूर धावा दिल्या. त्यामुळे आमची गोलंदाजी खराब आहे असे म्हणता येणार नाही.

पवन नेगीच्या सहभागाबद्दल त्याल विचारले असता विराट म्हणाला की, संघात एका अष्टपैलू खेळाडूची कमतरता आम्हाला पहिल्या दोन्ही सामन्यात जाणवली होती, त्याचबरोबर नेगी आपल्या फिरकीने पहिल्या फळीतील गोलंदाजांवरील अतिरिक्‍त भार कमी करण्यास उपयुक्‍त ठरू शकेल, असा विचार करून आम्ही त्याला अकरा खेळाडूंमध्ये स्थान दिले होते. सामन्यातील वॉशिंग्टन सुंदरच्या कामगिरीबाबत बोलताना कोहली म्हणाला की संघाच्या तळातील फलंदाजांनी चांगली कामगिरी केल्यावर पहिल्या फळीतील फलंदाज जरी अपयशी ठरले, तरी संघावरील दडपण दूर होण्यास त्याची मदत होते. परंतु विजयासाठी आमच्या प्रमुख फलंदाजांनाच जबाबदारी उचलणे आवश्‍यक आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)