खेलो इंडिया युथ गेम्स: वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राच्या शुभम कोळेकर याला विक्रमासह सुवर्ण

अभिषेक महाजनचेही यश

पुणे: वेटलिफ्टिंगमधील 17 वषार्खालील गटात 55 किलो वजनी गटात महाराष्ट्राच्या अभिषेक महाजन याने सोनेरी वेध घेतला. त्याने स्नॅचमध्ये 90 किलो तर क्‍लीन व जर्कमध्ये 121 किलो असे एकूण 211 किलो वजन उचलले. छत्तीसगढच्या सुभाष लहारे याने अनुक्रमे 91 किलो व 114 किलो असे एकूण 205 किलो वजन उचलून रौप्यपदक पटकाविले. गोलम टिकू याने अनुक्रमे 89 किलो व 112 किलो असे एकूण 201 किलो वजन उचलीत ब्रॉंझपदक जिंकले.

स्पर्धेतील 21 वषार्खालील गटात शुभम कोळेकर याने 55 किलो गटात क्‍लीन व जर्कमध्ये विक्रम प्रस्थापित केला. त्याने 139 किलो वजन उचलीत स्वत: नोंदविलेला 138 किलो हा विक्रम मोडला. त्याने स्नॅचमध्ये 97 किलो व एकूणात 236 किलो वजन उचलून विजेतेपद पटकाविले. तो सांगली येथे संतोष सिंहासने यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. त्याने यापूर्वी विशाखापट्टणम येथे झालेल्या कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत ब्रॉंझपदक मिळविले होते, तर नागपूर येथे नुकत्याच झालेल्या युवा गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते.

महाराष्ट्रच्या प्रशांत कोळी याने येथे ब्रॉंझपदकाची कमाई करीत संघास आणखी एक पदक मिळवून दिले. त्याने स्नॅचमध्ये 104 किलो तर क्‍लीन व जर्कमध्ये 121किलो असे एकूण 225 किलो वजन उचलले. ओडिशाच्या मुन्ना नायक याला रौप्यपदक मिळाले. त्याने 230 किलो वजन उचलले.

ओडिशाच्या भक्ताराम देस्ती याने 49 किलो वजनी विभागात विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. त्याने क्‍लीन व जर्कमध्ये 105 किलो वजन उचलून स्वत नोंदविलेला 104 किलो हा विक्रम मोडला. त्याने स्नॅचमध्ये 84 किलो वजन उचलले आणि एकूण 186 किलो वजन उचलून सोनेरी कामगिरी केली. तामिळनाडूच्या टी.माधवन याने स्नॅचमध्ये 79 किलो तर क्‍लीन व जर्कमध्ये 93 किलो असे एकूण 172 किलो वजन उचलले आणि रौप्यपदक पटकाविले. त्याचा सहकारी के.गुरु कन्नन याला ब्रॉंझपदक मिळाले. त्याने स्नॅचमध्ये 72 किलो तर क्‍लीन व जर्कमध्ये 93 किलो असे एकूण 165 किलो वजन उचलले. महाराष्ट्राच्या मुकुंद आहेर याला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्याने स्नॅचमध्ये 70 किलो तर क्‍लीन व जर्कमध्ये 91 किलो असे एकूण 161 किलो वजन उचलले. या स्पधेर्तील पदक विजेत्यांना ऑलिंपिक रौप्य व ब्रॉंझपदक विजेता कुस्तीगीर सुशीलकुमार याच्या हस्ते पदक देण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)