खेलो इंडियासाठी पुण्यनगरी सज्ज !

बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीच्या बॅडमिंटन सभागृहात रंगणार उद्‌घाटन सोहळा

पुणे: देशभरातील युवा खेळाडूंचे कौशल्य पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या क्रीडा चाहत्यांना बुधवार (दि.9 जानेवारी) पासून खेळाचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे. देशभरातील अव्वल दर्जाच्या खेळाडूंचा समावेश असलेल्या खेलो इंडिया क्रीडा महोत्सवाला बुधवारी सायंकाळी 6 वाजता प्रारंभ होणार आहे. त्यामध्ये खेळाडू, प्रशिक्षक व अन्य पदाधिकारी मिळून 10 हजार लोकांचा सहभाग असणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

केंद्रीय क्रीडामंत्री व ऑलिम्पिक रौप्यपदक विजेते नेमबाज राज्यवर्धनसिंह राठोड, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महोत्सवाचा प्रारंभ होणार आहे. दोन तास चालणाऱ्या उद्‌घाटन सोहळ्यात महाराष्ट्रातील पारंपरिक लोककलांचे सादरीकरण होणार आहे. या समारंभासाठी राज्यातील अर्जुन व शिवछत्रपती पुरस्कार विजेते तसेच ज्येष्ठ ऑलिंपिकपटूंना निमंत्रित करण्यात आले आहे. राज्यातील विविध खात्यांचे मंत्री, स्थानिक आमदार व खासदारांनाही निमंत्रित करण्यात आले असून सर्वांकरिता विशेष आसनव्यवस्था करण्यात आली आहे.

उद्‌घाटन सोहळ्यात महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण, महोत्सवानिमित्त प्रकाशित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे मुखपत्र असलेल्या लोकराज्यचे प्रकाशन करण्यात येणार आहे. सहभागी खेळाडूंचे शानदार संचलन, क्रीडाज्योत प्रज्वलन आदी कार्यक्रमांचाही या सोहळ्यात समावेश आहे. महोत्सवासाठी विविध राज्यांच्या खेळाडूंचे आगमन झाल्यामुळे क्रीडानगरीत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

हॉकीसह जिम्नॅस्टिक खेळांच्या स्पर्धांना सहा तारखेलाच प्रारंभ झाला आहे. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत आपल्या देशाच्या खेळाडूंना फारसे यश मिळत नाही हे लक्षात घेऊन सामान्य नागरिकांना क्रीडा संस्कृतीची ओळख व्हावी व त्यामधून भावी ऑलिम्पिक पदक विजेते खेळाडू घडावेत हा या स्पर्धेचा मुख्य हेतू आहे.


क्रीडाविषयक चित्रे आणि पोस्टर्समधून जनजागृती

क्रीडानगरीतील विविध भितींवर नानाविध खेळांची चित्रे रंगविण्यात आली आहे. तसेच संपूर्ण क्रीडानगरीमध्ये आवश्‍यक त्याठिकणी रंगरंगोटीही करण्यात आली आहे. क्रीडनगरीप्रमाणेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात अनेक ठिकाणी या महोत्सवाबाबत आकर्षक पोस्टर्स लावण्यात आली आहेत. विशेषत: दोन्ही शहरांमधील शाळा व महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारांजवळ ही पोस्टर्स लावण्यात आली आहेत.


महाराष्ट्राच्या खेळाडूंना 15 दिवसांचे विशेष प्रशिक्षण

महाराष्ट्राला खेलो इंडिया स्पर्धेचे यजमानपद मिळणे हा महाराष्ट्रासाठी गौरव असून यामुळे महाराष्ट्रात एक मोठा क्रीडा महोत्सव आयोजित होत आहे. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी या स्पर्धेत चांगली कामगिरी करावी तसेच चांगले गुण मिळवावे यासाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंना 15 दिवसांचे विशेष प्रशिक्षण त्या त्या खेळाच्या मार्गदर्शकाकडून देण्यात आल्याचे क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी बॉम्बे जिमखाना येथे खेलो इंडिया स्पर्धेबाबतची माहिती पत्रकारांना देताना सांगितले.


आठवड्यातील एक संध्याकाळ नो गॅझेट डे

व्हिडिओ गेम छोडो, मैदान से नाता जोडो असे आपण म्हणताना आपण आपल्या विद्यार्थ्यांना गॅझेटपासून दूर करणे आवश्‍यक आहे. आजच्या विद्यार्थ्यांनी गॅझेटवर कमी आणि मैदानात जास्त वेळ घालविणे आवश्‍यक आहे. आज खेळामध्येही चांगले करिअर होऊ शकते हे लक्षात घेऊन खेळाला महत्व देणे आवश्‍यक आहे. त्यामुळे शाळांनी आणि पालकांनी सुध्दा आपल्या मुलांनी आठवड्यातील एक संध्याकाळ नो गॅझेट डे म्हणून साजरा करावे, असे आवाहन क्रीडा मंत्र्यांनी केले आहे.


10 जानेवारीला ओपन बोडार्ची लिंक देण्यात येणार

शिक्षण प्रवाहापासून दूर गेलेल्या आणि शारीरिक क्षमतांमुळे शाळेत पोहोचू न शकणाऱ्या या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी, क्रीडा स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम यांच्यामध्ये सहभाग घेत असताना त्याच दिवशी आलेल्या परीक्षांमुळे सहभागी होण्यास अडचण येते. आता अशा विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी ओपन बोर्डाची स्थापना करण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा/कार्यक्रम करुन शिक्षण पूर्ण करता येणार आहे. 10 जानेवारीला ओपन बोर्डाबाबतची लिंक दिली जाईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)