खेड शिवापूर टोलनाका व्यवस्थापनात बदल

कापूरहोळ-पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील सर्वात महत्त्वाचा, जास्त वर्दळीचा असलेल्या खेड-शिवापूर टोल नाक्‍याचे स्थानिक व्यवस्थापन बदलणार, ते कुणाकडे जाणार याची चर्चा जोरात रंगलेली असताना अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला. सोमवार (दि. 7 जानेवारी) व्यवस्थापन बदलण्यात आले. प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेऊन आम्ही टोलचे व्यवस्थापन करू, अशी माहिती विकास शिंदे, अभय कोंडे आणि महेश लखन दळवी या नवीन टोल व्यवस्थापकांनी दैनिक प्रभातच्या प्रतिनिधीला ही माहिती पत्रकार परिषदेत दिली.
यापूर्वी खेड-शिवापूर टोल नाक्‍याचे व्यवस्थापन एका स्थानिकाकडे होते. गेल्या एक महिन्यांपासून या स्थानिक टोल व्यवस्थापनात बदल होणार असल्याची चर्चा होती. त्यानुसार हे टोल व्यवस्थापन कोणाकडे जाणार? याची संपूर्ण परिसरात जोरदार चर्चा होती. त्यात अनेक स्थानिक राजकीय मंडळींची नावेही चर्चेत होती. अखेर सोमवार (दि. 7) पासून खेड-शिवापूर टोलनाक्‍याचे स्थानिक व्यवस्थापन विकास शिंदे, अभय कोंडे आणि महेश लखन दळवी यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. प्रवाशांच्या तक्रारी लिहून घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, रिलायन्स इन्फ्रा आणि संबंधित उपठेकेदार कंपनीकडे पाठपुरावा करून त्या तक्रारी दूर केल्या जातील. स्थानिक नागरिकांची वाहने टोल नाक्‍यावरून पूर्वीप्रमाणेच मोफत सोडली जातील. त्यासाठी स्थानिक नागरिकांनीही आपले ओळखपत्र दाखवून टोल प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नवीन टोल व्यवस्थापनाने यावेळी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)