खेड शिवापुर फाट्यावर वाहतूक कोंडी

  • बाशी ईदनिमित्त कमरअली दुर्वेश बाबांच्या दर्शनाला गर्दी

कापूरहोळ – खेड शिवापूर (ता. हवेली) येथे बाशी ईदनिमित्त भविकांनी येथील हिंदू मुस्लीम धर्मीयांचे एकतेचे प्रतिक असलेल्या हजरत पीर कमरअली दुर्वेश बाबांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती; परंतु येथे आलेल्या भाविकांनी महामार्गालगत वाहने कशीही उभी केल्याने खेड-शिवापूर फाट्यादरम्यान मोठी वहातूक कोंडी होऊन सुमारे एक किलो मिटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
शनिवार (दि. 16) रमजान ईदनिमित्त मुस्लीम भाविकांनी एकत्रित येऊन येथील ईदगाह मैदानावर नमाज पठण केले.यावेळी भाविकांनी बाबांचे (दर्ग्याचे) दर्शन घेऊन उपस्थित मुस्लीम भाविकांनी एकमेकास आलिंगन आणि गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. रविवारी (दि. 17) बाशी ईदनिमित्त सकाळपासून भाविकांनी बाबांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.आलेल्या भाविकांनी दर्ग्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा वेडीवाकडी वाहने उभी केल्याने दर्ग्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली, तसेच पुणे-सातारा महामार्गालगत आणि सेवा रस्त्यालगत दोन्ही बाजूला भाविकांनी वाहने उभी केल्याने साताराहून पुणेकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होईन सुमारे एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रात्रीउशिरापर्यंत वाहतूक कोंडीमुळे प्रवासी त्रस्त झाले होते. वाहतूक सुरळीत करण्यासाठी राजगड पोलीस आणि महामार्ग मदत केंद्राचे अधिकारी यांची धांदल उडाली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)