खेड येथे 27 मार्चपासून हरिनाम सप्ताह

संग्रहित छायाचित्र

खेड – कर्जत तालुक्‍यातील खेड येथे हनुमान जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. 27 मार्चपासून सप्ताहाला प्रारंभ होत आहे. सप्ताहात पहाटे 5 ते 7 या वेळेत काकडा, दुपारी गाथा भजन, सायंकाळी 5 ते 6 प्रवचन, सायंकाळी 7 ते 8 हरिपाठ, रात्री 9 ते 11 या वेळेत कीर्तन होणार आहे. पांडुरंग सातपुते महाराज, संतोष गाडेकर महाराज, संदीपान शिंदे महाराज, सतीश मोरे महाराज यांची कीर्तनसेवा सप्ताहात होईल. शनिवारी सकाळी 10 ते 12 या वेळेत ज्ञानेश्‍वर खराडे महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे. सप्ताहात अमर वाघमारे मृदुंगाचार्य असणार आहेत. कीर्तनसेवेचा लाभ घेण्याचे आवाहन खेडच्या भजनी मंडळीकडून करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)