खेड येथे डिजिटल सेवा सुरू

खेड – कर्जत तालुक्‍यातील खेड येथे पॅनकार्ड, पासपोर्ट, वीजबिल भरणा डिजिटल सेवा सुरू झाली. विराज मोहिते यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. पॅनकार्ड, पासपोर्ट, लाईट बिल भरणा, मतदार नावनोंदणी, मनी ट्रान्सफर, इन्कमटॅक्‍सची कामे, एलआयसी हप्ता भरणा, रेल्वे तिकीट बुकिंग, आदी सुविधा येथे अल्पदरात उपलब्ध होणार आहेत. ग्रामीण भागात अधिकाधिक डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. खेड येथे औटेवाडी, गणेशवाडी, वायसेवाडी, आखोनी, शिंपोरा भागातील ग्रामस्थ विविध कामांसाठी येतात. त्यांच्यासाठी विविध ऑनलाइन सेवा उपलब्ध झाल्याने वेळ आणि पैशांची बचत होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)