खेड बाजार समितीकडून केरळग्रस्तांना 50 हजार

राजगुरुनगर- खेड कृषी उत्पन्न बाजार समितीकडून केरळ पूरग्रस्तांसाठी 51 हजार रुपयांची मदत पाठविण्यात आल्याची माहिती बाजार समितीचे सभापती चंद्रकांत इंगवले, प्रभारी सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी दिली. केरळमध्ये शतकातील सर्वांत मोठा महापूर आला होता. यामध्ये सर्वसामान्य जनतेचे मोठे नुकासान झाले, तर अनेकांना जीव गमवावे लागले, अनेक जण जखमी झाले आहेत. याबरोबरच त्यांच्या साधन संपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना मदत करण्यासाठी देशातील सर्वांनीच मदतीचा हात पुढे केला आहे. पूर परिस्थिती आणि नागरिकांचे झालेले नुकसान कधीही भरून येणारे नाही. या परिस्थितीचे भान ठेवून त्यांना मदत करण्याचा निर्णय सर्व बाजार समितीच्या संचालकांनी घेतला. त्यानुसार खेड कृषी उत्पन्न बाजार समितीने केरळ पूरग्रस्त नागरिकांसाठी तब्बल 51 हजार रुपये आर्थिक मदत केली आहे मदतीचा धनादेश खेडचे सहाय्यक निबंधक सहकारी संस्थाचे श्रीकांत श्रीखंडे यांच्याकडे सभापती चंद्रकांत इंगवले यांनी सपूर्द केला. यावेळी माजी सभापती विलास कातोरे, सचिव सतीश चांभारे, प्रभारी सचिव बाळासाहेब धंद्रे यांच्यासह बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)