खेड पंचायत समितीच्या उपसभापती पोखरकर

राजगुरूनगर- खेड पंचायत समितीच्या उपसभापतीपदी शिवसेनेचे भगवान नारायण पोखरकर यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
अमोल पवार यांनी खेड पंचायत समितीच्या उपसभापती पदाचा ठरल्यानुसार शुक्रवारी (दि. 15 जून) राजीनामा दिला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने उपसभापती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. शुक्रवारी (दि. 22 जून) सहायक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी आयुष प्रसाद यांची उपसभापतीपदाच्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवड केली होती. त्यानुसार आज (शनिवारी) पंचायत समितीची उपसभापती पदाची निवडणूक घेण्यात आली. उपसभापती पदासाठी भगवान पोखरकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. सदस्य अंकुश राक्षे यांनी सूचक म्हणून त्यांच्या अर्जावर सही केली होती. तर यापदासाठी पोखरकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसभापतीपदी निवड झाल्याचे आयुष प्रसाद घोषित केले.
या निवडणुकीसाठी सभापती सुभद्रा शिंदे, पंचायत समिती सदस्य मंदा शिंदे, अंकुश राक्षे, नंदा सुकाळे, सुनिता सांडभोर, ज्योती अरगडे, वैशाली गव्हाणे, अरुण चौधरी, अमर कांबळे, वैशाली जाधव, मच्छिंद्र गावडे, चांगदेव शिवेकर हे सदस्य उपस्थित होते तर मावळते उपसभापती अमोल पवार हे एकमेव सदस्य अनुपस्थित होते.सह निवडणूक निर्णय अधिकारी तथा गटविकास अधिकारी रोहिणी बानकर,अधिक्षक रमेश इष्टे, चंद्रिका तळपे, रमेश भोगावडे, सुहास शिंदे उपस्थित होते.
खेड पंचायत समितीमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. समितीमध्ये शिवसेनेचे आठ, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चार तर भाजप आणि कॉंग्रेस प्रत्येकी एक सदस्य असे पक्षीय बलाबल आहे. निवडीनंतर पंचायत समितीसमोर निवड सभा झाली या सभेला जिल्हा महिला संघटक विजया शिंदे, उपजिल्हा प्रमुख शिवाजी वर्पे, तालुका प्रमुख प्रकाश वाडेकर, आरपीआयचे तालुका अध्यक्ष संतोषनाना डोळस, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, तनुजा घनवट, महिला प्रमुख नंदा कड, उद्योजक मनोहर पोखरकर, संतोष सांडभोर, माजी उपनगराध्यक्षा सारिका घुमटकर, नगरसेवक शंकर राक्षे, उर्मिला सांडभोर, मारुती सातकर उपतालुका प्रमुख अंबर सावंत,शांताराम पोखरकर, हरिदास जठार यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते, वाळद गावाचे ग्रामस्थ उपस्थित झाले.

  • विविध योजना राबविणार, कुपोषित बालकांचा प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न करू, विश्‍वासाला तडा जाणार नाही याची काळजी घेणार आहे.
    – भगवान पोखरकर, नवनिर्वाचित उपसभापती, खेड पंचायत समिती 
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)