खेड पंचायत समितीच्या इमारतीला पुरवणी बजेटमध्ये निधी मिळेल

राजगुरूनगर- पुरवणी बजेटमध्ये खेड पंचायत समितीच्या इमारतीला निधी मिळेल, असे प्रतिपादन आमदार सुरेश गोरे यांनी येथे केले.
जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या माध्यमातून राजगुरूनगर येथील प्राथमिक शाळा क्र. 1 च्या बांधण्यात येणाऱ्या संरक्षण भिंतीच्या कामाचे भूमिपूजन आमदार सुरेश गोरे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, बाबाजी काळे, पंचायत समिती सुनीता सांडभोर, प्रकाश वाडेकर, मारुती सातकर, एल बी तनपुरे, शाखा उपअभियंता सुरेश कानडे, नगरसेवक शंकर राक्षे, मंगेश गुंडाळ, सुनील टाकळकर, शाळा समितीचे अध्यक्ष दत्ता बेंद्रे, उद्योजक संतोष सांडभोर, केंद्रप्रमुख गजानन परदेशी, मुख्याध्यापक राजेश कांबळे, उपशहर प्रमुख संतोष वाळुंज, दीपक सातकर, शिक्षणाधिकारी राजेश बनकर, बापू अडागळे यांच्यासह शिक्षक, पालक पस्थित होते.
आमदार सुरेश गोरे म्हणाले की, मराठी माध्यमातील मुले सर्वच क्षेत्रात पुढे आहेत. शाळेच्या गरजा लक्षात घेऊन काम केले पाहिजे. शासकीय कामे दिरंगाईने होतात मात्र त्याचा पाठपुरावा करावा लागतो. नगरपरिषद हद्दीतील दवाखाने, शाळा जिल्हा परिषदेच्या अधिपत्याखाली आहेत नगर परिषदेच्या डीपीआर होणे बाकी आहे. विकास कामांना सकारात्मक पाठिंबा देणे हे लोक प्रतिनिधींचे काम आहे. मात्र ही कामे होत असताना ती अडवविणे योग्य नाही. समाजाच्या फायद्याचे आणि गरजेच्या कामना प्राधान्य देण्यात येत असून शिक्षकांची प्रलंबित बिलांचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. शिक्षकाचे अनेक प्रश्न आहेत ते सोडविण्याचे प्रयत्न आहेत.पुरवणी बजेट मध्ये खेड पंचायत समितीच्या इमारतीला निधी मिळेल.जिल्हा परिषद सदस्य व आमदार यांच्या फडातून शाळा विकासासाठी निधी देण्याचा प्रयत्न आहेत. मात्र शाळेचा दर्जा, पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत. यावेळी येथील शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी मर्सिडीज बेंझ कंपनीकडून देण्यात आलेल्या शौचालय युनिटचे लोकार्पण आमदार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. राजेश कांबळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)