खेड निम्मा नाही, संपूर्णच दुष्काळी जाहीर करा

वाडा, पाईट, कडूस, चासच्या शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे मागणी

राजगुरूनगर- खेड तालुक्‍यात सर्वत्र दुष्काळ असताना केवळ अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे खेड तालुक्‍यातील काही भाग दुष्काळग्रस्त यादीत आला नसल्याने सर्वत्र नाराजी आहे. महसूल व कृषी विभाग अकार्यक्षमतेने काम करीत असून शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे लक्ष दिले जात नाही. तालुक्‍यातील काही भागात दुष्काळ आणि काही भागात दुष्काळ नसल्याचे वास्तव अधिकारी निर्माण करीत आहेत त्यामुळेच शासनाचे लाभ मिळत नसल्याने शेतकऱ्यांत अधिकारी वर्गा विरोधात तीव्र संताप आहे.
या पार्श्‍वभुमीवर खेड तालुक्‍यातील वाडा, पाईट, कडूस, चास मंडल विभागाचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती अरुण चांभारे यांनी केली आहे. खेड तालुक्‍यातील वाडा, कडूस, पाईट, चास मंडल विभागातदुष्काळ जाहीर करावा त्याची नवे शासनाच्या यादीत प्रदिद्द करण्यासाठी कृषी व महसूल अधिकाऱ्यांनी शासनाकडे फेरअहवाल सदर करावा. संपूर्ण खेड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशी मागणी होत आहे. या मागणीचे खेड तहसीलदार, कृषी विभागाकडे देण्यात आले. यावेळी सरपंच संघटनेचे माजी अध्यक्ष पांडुरंग जठार, वाशेरेचे माजी सरपंच उल्हास कुडेकर, वाजवणेचे माजी सरपंच चंद्रकांत आंद्रे,आदी शेतकरी उपस्थित होते.
दरम्यान, खेड तालुक्‍यात यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने खरीप हंगामातील सर्वच पिके वाया गेली आहेत. तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात सर्वाधिक घेतले जाणारे भात पिक पावसाअभावी वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. मुख्य पिक भाताचे 50 टक्क्‌यांपेक्षा कमी उत्पादन आले आहे, असे असताना राज्याच्या दुष्काळी यादीत सुरुवातील खेड तालुक्‍याचे नाव आले नव्हते. त्यानंतर सर्वांनी याबाबत पाठपुरावा केल्याने प्रशासन जागे झाले त्यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर खेड तालुक्‍यातील चाकण, कनेरसर, आळंदी, पिंपळगाव या मंडलविभागाचा समावेश करण्यात आला आहे. वास्तविक वाडा, कडूस, पाईट, चास मंडल मध्ये 50 टक्क्‌यापेक्षा कमी पाऊस पडला आहे. या परिसरातील बटाटा, भुईमुग, भात, सोयाबीन पिकांचे पावसाभावी मोठे नुकसान झाले. 50 टक्क्‌यापेक्षा कमी उत्पादन झाले. यामुळे शेतकरी अडचणी आला असताना शासनाच्या दुष्काळग्रस्त यादीत वाडा, कडूस, पाईट, चास मंडलची नावे आली नसल्याने शेतकऱ्यांत नाराजी पसरली आहे. खरीप हंगामात पाऊस कमी पडल्याने रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा, वाटणा आदि पिके शेतकऱ्यांना घेता आली नसल्याने मोठे नुकसान झाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)