खेड तालुक्‍यात 29.44 टक्के सोयाबीन क्षेत्रात वाढ

चिंबळी- खेड तालुक्‍याच्या दक्षिण भागात पावसाची संततधार सुरू असल्याने भात खाचरे भरल्याने भात पीक बहरले आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी कडधान्य पिके घेतली आहेत, त्यांच्या पिकांना हा जदाचा पाऊस हानिकार ठरत आहे. तर सोयाबीन पिकांवर पानखाणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव झाल्याने येथील शेतीची तालुका कृषी अधिकाऱ्यांनी पाहणी करून विविध उपाययोजना सुचल्या आहेत. तर खेड तालुक्‍यात यंदा 29.44 टक्के सोयाबीनचे क्षेत्र वाढले असल्याचेही त्यांनी नमूद केले.
निघोजे व कुरुळी येथील सोयाबीनची पाहणी तालुका कृषी अधिकारी एल. व्ही. होटकर, मंडलकृषी अधिकारी एन. डी. वेताल, कृषी सहाय्यक एस. एस. सरोदे, ए. वाय. जाधव यांनी पाहणी केली असून त्यांनी पानखाणाऱ्या अळींपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी विविध उपाययोजना सुचविल्या आहेत. दरम्यान, एल. व्ही. होटकर म्हणाले की, खेड तालुक्‍यात खरीप हंगामातील पिकाची 82.43 टक्के पेरणी झाली आहे. त्यापैकी सोयाबीन पिकांची पेरणी सरासरीपेक्षा अधिक झाली आहे. तालुक्‍यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र 5 हजार हेक्‍टर आहे मात्र, यंदा समाधानकारक पाऊस व शासनाच्या हमीभावातील वाढीमुळे सोयाबीनचे क्षेत्र वाढले असून ते 6 हजार 472 हेक्‍टर क्षेत्रावर घेण्यात आले आहे. त्यामुळे पेरणी क्षेत्राची टक्केवारी 129.44 भरते म्हणजेच तब्बल 29.44 टक्के सोयाबीन पिकाच्या क्षेत्रात वाढ झालेली आहे. यावर्षी पाऊस समाधानकारक झाला असला तरी शेतकऱ्यांनी पिकांच्या संरक्षणासाठी सावध राहणे आवश्‍यक आहे. निघोजे व कुरुळी येथील सोयाबीन क्षेत्रामध्ये पानेखाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव अधिकप्रमाणात झालेला असल्याने शेतकऱ्यांनी खास काळजी घेण्यासोबतच विशेष उपाययोजना सुचविल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)