खेड तालुक्‍यात विविध उपक्रम

राजगुरूनगर- राजगुरुनगर येथे स्वातंत्र्यदिनाच्यानिमित्ताने शाळा, महाविद्यालये, शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. शासकीय ध्वजारोहण तहसीलदार कार्यालयात सहाय्यक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले.
खेड तालुक्‍याची राजधानी असलेल्या राजगुरुनगर शहरातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा महाविद्यालये, बॅंका, संस्था, संघटनांची कार्यालये पेट्रोल पंप आदी ठिकाणी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ध्वजारोहण करण्यात आले. शासकीय ध्वजारोहण व उपविभागीय अधिकारी कार्यालयात प्रांताधिकारी आयुष प्रसाद, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात पोलीस उपाधीक्षक गजानन टोणपे, नगरपरिषद, हुतात्मा राजगुरू जन्मस्थळस्मारकात नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, खेड पंचायत समिती गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार, सभापती सुभद्रा शिंदे, जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायायाल न्यायाधीश एन. के. ब्रह्मे, उपविभागीय भूमी अभिलेख उमेश झेंडे, सार्वजनिक बांधकाम विभाग भास्कर क्षीरसागर आदि ठिकाणी ज्यात्या खात्याच्या प्रमुखाने ध्वजारोहण केले.
दरम्यान, आयुष प्रसाद यांनी विविध पक्ष, संस्था, संघटना सामाजिक कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी वर्षभरात झालेल्या घटनांचा त्यांनी आढावा घेतला चांगले काम केलेल्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी पोलीस उपाधीक्षक गजानन टोणपे, तहसीलदार अर्चना यादव, पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, कृषी अधिकारी लक्ष्मण होटकर, अधीक्षक अभियंता भूमीअभिलेख उमेश झेंडे, नायब तहसीलदार राजेंद्र जाधव, राजेश कानसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता भास्कर क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप येळे, वैशाली बारणे, भीमाशंकर देवस्थानट्रस्टचे अध्यक्ष सुरेश कौदरे, खेड पंचायत समितीचे उपसभापती भगवान पोखरकर, सदस्या ज्योती अरगडे, रुपाली जाधव, अमर कांबळे, शिवसेनेचे विजया शिंदे, गणेश थिगळे,चैतन्य संस्थेच्या डॉ सुधा कोठारी, नगरसेवक राहुल आढारी, सुरेखा क्षोत्रीय, सुनील थिगळे, मुरलीधर खांगटे यांच्यासह मोठ्या संख्येने शहरातील नागरिक, पदाधिकारी सरकारी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

  • तालुक्‍यातील चाकण दंगल वगळता ऑनलाईन सातबारा, झिरो पेंडन्सी, भामा आसखेड धरणग्रस्त शेतकऱ्यांचे सोडवलेले पश्न, शहरातील अतिक्रमणे, शहरातील वाहतूक कोंडी आदि बाबत चांगली कामे झाली आहेत. महसूल विभागाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजना आणि पंचायत समिती अंतर्गतसर्व ग्रामपंचायती पेपरलेस यात खेड तालुका महाराष्ट्रात अव्वल ठरला आहे. शहरातील अतिक्रमणे पुन्हा काढण्यात येणार असून त्यासाठी खास मोहीम हाती घेतली जाणार आहे अतिक्रमण कारवाईत पुनर्वसन प्रश्‍न मागे राहिला आहे. नगरपरिषदेने त्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
    आयुष प्रसदर, सहाय्यक जिल्हाधिकारी

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)