खेड तालुक्‍यात मतमोजणी शांततेत

राजगुरूनगर- खेड तालुक्‍यात 13 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी आज (सोमवारी) शांततेत पार पडली.
हुतात्मा राजगुरू क्रीडा संकुलात निवडणूक निर्णय अधिकारी तथा निवासी नायब तहसीलदार राजेश कानसकर यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी झाली. एकूण 13 पैकी 12 ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्य पदासाठी मतमोजणी झाली सरपंच पदासाठी एकूण 29 उमेदवार रिंगणात होते. 9 टेबलच्या माध्यमातून तीन फेऱ्यामध्ये मतमोजणी झाली. खेड तालुक्‍यातील वाळद, कोहिनकरवाडी, सातकरस्थळ, सांडभोरवाडी येथील सरपंच पदासाठीमोठी चुरस लागली होती. सांडभोरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सर्वाधिक मताधिक्‍याने अरुण थिगळे यांची निवड झाली तर कोहिनकरवाडी ग्रामपंचायत सरपंचपदी वैशाली कोहिनकर या केवळ दोन मतांनी विजयी झाल्या आहेत. दरम्यान, निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव, सहाय्यक निरीक्षक आदित्य लोणीकर यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने मतमोजणी शांततेत पार पडली. तालुक्‍यातील 13 पैकी सातकरस्थळ, सुपे, एकलहरे, वाघू, मोरोशी, धुवोली या सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर उर्वरित ग्रामपंचायतीच्या सदस्य पदाच्या निवडणुका आटीतटीच्या झाल्या. निवडणुकीच्या निकालानंतर विजयी उमेदवारांनी मोठ्या मिरवणुका काढल्या.

  • 13 ग्रामपंचायतीचे सरपंच
    सांडभोरवाडी : अरुण थिगळ, सातकरस्थळ : संजीवनी थिगळे, सुपे : प्रकाश मोहन, तिफनवाडी : दीपक कडलग, वाळद : रुचिरा पोखरकर, आडगाव : प्रकाश गोपाळे, डेहणे : दत्तात्रय खाडे, कोहिनकरवाडी : वैशाली कोहिणकर, एकलहरे : अजय आंबेकर (बिनविरोध), धुवोली : (रिक्‍त), वाघू : सावळेराम भोईर (बिनविरोध), मोरोशी : जयश्री नांगरे, वहागाव : सुदाम पवार.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)