खेड तालुक्‍यातील सात रस्त्यांसाठी साडेबावीस कोटी

संग्रहित छायाचित्र
 • अर्थसंकल्पात मंजुरी : उरण-भीमाशंकर रस्त्यालाही मान्यता

राजगुरुनगर,दि.30(प्रतिनिधी) : खेड तालुक्‍यातील महत्त्वाच्या 7 रस्त्यांच्या कामांना अर्थसंकल्प अधिवेशन 2018-19 मध्ये 22 कोटी 64 लाख रुपये निधी मंजूर झाला असून गेली अनेक वर्षे प्रलंबित असणाऱ्या उरण-भीमाशंकर रस्त्याला मान्यता मिळून रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे, अशी माहिती आमदार सुरेश गोरे यांनी दिली.
मागील वर्षा (2017-18)च्या तुलनेत (11. 38 कोटी) या वर्षी (22 कोटी 64 लाख) जवळपास दुप्पट निधीची वाढ करण्यात आली आहे. तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील आदिवासी भागातील दळणवळण सुरळीत होवून शेतकऱ्यांच्या विकासात वाढ होण्यास मदत होणार आहे. खेड तालुक्‍यातील वांद्रे,आंबोली औंढे, धामणे ,आसखेड, कुरकुंडी, चांदूस, पिंपरी, मंदोशी, वाळद ते भोरीगिरी पर्यंतची गावे आणि पूर्व भागातील वडगाव घेनंद, चिंचोशी, मोहीतेवाडी, वाफगाव, वरुडे या भागातील रस्त्यांना निधी मिळाला आहे. आदिवासी भागातील नायफड जवळील ढाबेवाडी, सरेवाडी तसेच खरपुड जवळील आंबेकरवाडी या आदिवासी गावांना चांगला रस्ता होणार असल्याने या दुर्लक्षित गावांचा रस्त्याचा प्रश्‍न मार्गी निघणार आहे. बारा ज्योतिर्लिंग असणाऱ्या भीमाशंकर या पवित्र तीर्थक्षेत्राला येण्यासाठी मुंबई मार्गे भीमाशंकर जाण्यायेण्यासाठी 2008 पासून प्रलंबित असलेला उरण-भीमाशंकर हा रस्ता मंजूर झाला आहे. या रस्त्यासाठी सुमारे 6 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तालुक्‍याच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचा असा हा रस्ता असून मुंबईपासून भीमाशंकर हे अंतर कमी होणार असल्याने तालुक्‍यातून मुंबईला जोडला जाणार जवळचा मार्ग उपलब्ध होणार आहे.

 • कामाचे नाव, मार्गाचे नाव, मंजूर निधी पुढीलप्रमाणे :
  1. उरण पनवेल वांद्रे आंबोली कुडे घोटवडी शिरगाव मंदोशी भिमाशंकर वाडा खेड शिरूर रस्ता रामा 103 किमी 90/390 ते 113/825 चे भूसंपादन व सविस्तर अहवाल तयार करणे (ता. खेड) व मावळ)(तळपेवाडी ते पडारवाडी पर्यंत भूसंपादन व सर्वेक्षण) – राज्यमार्ग – 6 कोटी.
  2. (अ) उरण पनवेल वांद्रे आंबोली कुडे घोटवडी शिरगाव मंदोशी भिमाशंकर वाडा खेड शिरूर रस्ता रामा 103 किमी 176/00 ते 196/00 ची सुधारणा करणे (वाळद ते भोरगिरी) (ब) शिरगाव मंदोशी तळेघर रस्ता रामा 113 किमी 0/00 ते 7/665 रस्त्याचे नुतनीकरण करणे (मंदोशी ते तळेघर) – राज्यमार्ग- 3 कोठी 12 लाख 30 हजार.
  3. (अ) पुणे आळंदी केंदूर पाबळ पेठ रस्ता रामा 129 किमी 21/800 ते 40/200 व 50/00 ते 60/00 ची सुधारणा करणे (आळंदी ते वडगाव घेनंद, चिंचोशी, मोहीतेवाडी/ पाबळ ते वाफगाव) – राज्यमार्ग – 5 कोटी 58 लाख 45 हजार
  4. उरण पनवेल वांद्रे आंबोली कुडे घोटवडी शिरगाव मंदोशी भीमाशंकर वाडा (ता. खेड) शिरूर रस्ता रामा 103 किमी 111/00 ते 128/00 ची सुधारणा करणे (पडारवाडी ते वांद्रे , आंबोली ते औन्ढे) – राज्यमार्ग – 2 कोटी 73 लाख 59 हजार.
  5. धामणे आसखेड कुरकुंडी कोरेगाव चांदूस पिंपरी वाकी काळूस भोसे रस्ता प्रजिमा 72 किमी 0/00 ते 20/00 ची सुधारणा करणे( धामणे ते आसखेड, कुरकुंडी, कोरेगाव, चांदूस,पिंपरी) – जिल्हा व इतर मार्ग – 4 कोटी 60 हजार.
  6. प्रजिमा 31 (नायफड) ते ढाबेवाडी – सरेवाडी रस्ता ग्रामा 212 किमी0/00 ते2/00 – आदिवासी भागातील रस्ते – 6 कोटी.
  7. ग्रामा 117 ते आंबेकरवाडी रस्ता ते ग्रामा 215 किमी 0/00 ते 1/500 – आदिवासी भागातील रस्ते – 6 कोटी.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)