खेड तालुक्‍यातील भजनी मंडळांना साहित्यांचे वाटप

43 मंडळांचा समावेश : झेडपी सदस्यांच्या पाठपुराव्याला यश

राजगुरूनगर- खेड तालुक्‍यातील भजनी मंडळ आणि समाज प्रबोधन करणाऱ्या कला मंच मंडळाला पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत व समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून खेड पंचायत समितीच्यावतीने साहित्याचे वाटप करण्यात आले.
खेड तालुक्‍यात पुणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून खेड पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत विभागाच्या माध्यामतून 43 भजनी मंडळाला, तर समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून 20 टक्के जिल्हा परिषद समाज कल्याण निधीतून 52 गावातील वाड्या वस्त्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, शरद बुट्टे पाटील, बाबाजी काळे, निर्मला पानसरे, तनुजा घनवट, आदी जिल्हा परिषद सदस्यांनी जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा केला होता. गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार यांच्यामाध्यमातून यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आले होते.
खेड तालुक्‍यातील भजनी मंडळाला हार्मोनियम, सप्तकमृंदग, विणा, टाळ, तर समाज प्रबोधन करणाऱ्या मंडळांना हार्मोनियम, तबला, ढोलकी, संबळ, खंजेरी, तुणतुणे, डीमडी, आणि मंजिरी या साहित्याचे वाटप करणायत आले. आषाढी एकादशीचे औचित्य साधून जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांच्या हस्ते भजनी मंडळाला साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश कौदरे, नगरसेवक संदीप रासकर, भाजप जिल्हा डॉ. सेलचे अध्यक्ष डॉ. कराळे, सचिन लांडगे, विविध गावचे सरपंच, उपसरपंच यांच्यासह श्री हनुमान भजनी मंडळ भलवडी, आनंदीदेवी भजनी मंडळ भगतवाडी आव्हाट, श्रीराम सांप्रदायिक भजनी मंडळ औढें, संजूबाई प्रासादिक भजनी मंडळ कोकणेवस्ती, खामकरवाडी शेंदूरली, पदरवाडी भजनी मंडळ पदरवाडी भीमाशंकर, भैरवनाथ भजनी मंडळ घोटवडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)