खेड तालुक्‍यातील ऊस उत्पादकांचा गौरव

चिंबळी- संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची वाकड येथे झालेल्या 29 व्या वार्षिक सभेत खेड तालुक्‍यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये वडगाव घेनंद येथील शेतकरी तुकाराम बवले, कोयाळी येथील रामदास शिंदे, चिंचोशी येथील शिवाजी मोरे, मरकळ येथील शैलेश लोखंडे, धानोरे येथील गोविंद गावडे यांचा उत्कृष्ट उस उत्पादनाबबत कारखान्याचे अध्यक्ष व माजी खासदार विदुरा नवले, उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, माजी खासदार अशोक मोहोळ, संचालक अनिल लोखंडे यांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांची प्रतिमा व रोख 5 हजार व 10 हजार रुपये बक्षीस देवून सन्मान करण्यात आला. यावेळी कृष्णराव भेगडे, माजी आमदार दिगंबर भेगडे, ज्ञानेश्वर लांडगे, रमेशचंद्र ढमाले यांच्यासह आजी-माजी संचालक व सभासद शेतकरी उपस्थित होते


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)