खेड तालुका “ई-ग्राम’मध्ये राज्यात अव्वल

राजगुरूनगर- “ई-ग्राम’मध्ये पुणे जिल्हातील खेड तालुका राज्यामध्ये अव्वल ठरला असून तालुक्‍यातील सर्व ग्रामपंचायती पेपरलेस झाल्या असल्याची माहिती गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार यांनी दिली.
आपले सरकार सेवा केंद्र अंतर्गत खेड तालुक्‍यातील ग्रामपंचायती कागदरहित (पेपरलेस) बनल्या आहेत. केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या सर्व योजनांची प्रभावी अमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या ग्राम विकास विभागाने सर्व ग्रामपांचायती करीता एक राज्यव्यापी आयटी नेटवर्क तयार करण्यासाठी पुढाकार घेतला होता. सर्व ग्रामपांचायती यांच्या कामकाजामध्ये एकसूत्रता व सूचीबद्धता आणि पारदर्शकता आणण्यासाठी ग्रामविकास विभागाने आपले सरकार सेवा केंद्र या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात केली होती.
आपले सरकार सेवा कें द्र या प्रकल्पाचे प्रमुख उहिष्ट ग्रामपांचायत स्तरावरून आयटी संसाधनाच्या सहाय्याने महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती संगणकीकृत करून नागरिकांना त्याच्या रहिवासी क्षेत्रात सेवा देणे, पंचायती राज संस्थांच्या कामकाजामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि शासनाच्या सर्व योजनांची माहिती देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामपांचायतीना सक्षम करणे, महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती पेपरलेस करण्याचा ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासनाचा मानस आहे.
विभागाच्या सूचनेप्रमाणे ग्रामपंचायत अधिनियम 1958 आणि लेखासंहिता 2011 वर आधारित ई-ग्राम सॉफ्ट ही संगणक प्रणाली (डेषीुंरीश) विकसित केली आहे. ज्यामुळे ग्रामपांचायतीच्या कामकाजाचे व्यवस्थापन करण्यास व वरिष्ठांना आवश्‍यक ते अहवाल सादर करण्यासाठी मदत होत आहे. या प्रकल्पामुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजाला गती मिळाली आहे. ग्रामपंचायतीना सक्षम होण्यामध्ये मदत होत आहे.
पुणे जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपमुख्यकार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) संदीप कोहिनकर यांच्या पुढाकाराने पुणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती कागदविरहित(पेपरलेस) करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला होता. या उपक्रमास खेड तालुक्‍याच्या कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार आणि सर्व ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपले दप्तर “ईग्राम-सॉफ्ट’ या प्रणालीमध्ये संगणकीकृत केले आहे.
“ईग्राम-सॉफ्ट’ या प्रणालीमध्ये तालुक्‍यातील 162 ग्रामपांचायतीचे कामकाज कागदरहित(पेपरलेस) करण्यात पुणे जिल्ह्यातील खेड तालुका राज्यात अग्रेसर ठरला आहे. तालुक्‍यातील सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांनी गट विकास अधिकारी व सहाय्यक गटविकास अधिकारी यांच्या सूचनेनुसार आपले सरकार सेवा केंद्र केंद्राचालाकांच्या मदतीने ही कामगिरी पूर्ण केली आहे.

  • संगणकीकृत दाखले वितरीत
    खेड तालुक्‍यातील 162 ग्रामपंचायतीच्या 1 ते 33 नमुन्यातील माहिती सुचीबद्ध पद्धतीने साठववण्यात आली आहे. यामुळे तालुक्‍यातील सर्व ग्रामपांचायतीचे कामकाज संगणकाद्वारे होत आहे नागरिकांना त्यांच्या मागणीनुसार संगणकीकृत 1 ते 19 दाखले वितरीत करण्यात येत आहेत.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)