खेड घाटात आढळली मानवी हाडे

  • हत्या की आत्महत्या यावर प्रश्‍नचिन्ह ः मोबाईलही मिळाला

राजगुरुनगर – पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाटात निर्जन दरीमध्ये मानवी हाडे आढळली असून पोलिसांना त्याजवळ एक अर्धवट जळालेल्या अवस्थेत मोबाईल आढळून आला आहे. यामुळे ही हत्या की आत्महत्या? असा प्रश्न पोलिसांपुढे निर्माण झाला आहे. पोलिसांनी ही हाडे, कवटी ताब्यात घेतली असून ती तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविण्यात आली आहेत.
खेड तालुक्‍यात हत्या, आत्महत्या, बेवारस नागरिकांचे मृतदेह अशा घटनांमध्ये मोठ्या झपाट्याने वाढ होत आहे. असे असताना मंगळवारी (दि. 24) सकाळच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाटातील जंगलाच्या निर्जनस्थळी दरीत माणसाच्या डोक्‍याची कवटी व शरिरातील इतर हाडे आणि मोबाईल सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाटातील मागील बाजुच्या जंगलात अज्ञात महिला किंवा पुरुष यांच्या शरिरातील हाडे, कवटी, जबडा अशी आढळुन आली आहे. ही हाडे तपासणीसाठी लॅबला पाठविण्यात आली आहेत. तपासणी अहवाल आल्यानंतर पुढील तपासाला गती येईल असे पोलीस उपनिरीक्षक आदित्य लोणीकर यांनी सांगितले. पुणे नाशिक महामार्गावरील घाटात मानवी शरीराची हाडे मिळाल्याने संबंधित व्यक्तीची हत्या आहे की आत्महत्या? ही व्यक्ती कोण आहे पुरुष आहे की स्त्री? कशामुळे हे सर्व घडले? असे अनेक प्रश्न पोलिसांसमोर आहेत. या घटनेचा अधिक तपास खेड पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)