खेड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील अतिक्रमणे काढा

मनोज लोखंडे यांचे उपोषण सुरू; आत्मदहन करण्याचा इशारा
सातारा, दि.30(प्रतिनिधी) – खेड, ता.सातारा हद्दीतील वनवासवाडी गावठाणातील अतिक्रमणे काढून पाणंद रस्ता तयार करण्यात यावा, तसेच गावठाणातील शासनाच्या मालकीच्या जागेवर करण्यात आलेल्या बेकायदेशीर नोंदी रद्द कराव्यात, मागणीसाठी मनोज लोखंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले असून मागण्यांची दखल न घेतल्यास कोणत्याही क्षणी आत्मदहन करण्याचा इशारा लोखंडे यांनी दिला आहे.
मुंबई सरकारने सन 1950 साली ठराव करून खेड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सर्व मोकळ्या जागा, रस्ते, झाडे, झुडपे व मंदिर हे हक्कपत्‌ तयार करून ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिले आहेत. त्यातील 2 किमीच्या 33 फूट रुंदीच्या रस्त्यापैकी अर्धा किमी रस्त्यावर अतिक्रमणे करण्यात आल्यामुळे रस्ता रहदारी, वाहतुकीसाठी अपुरा व धोकादायक झाला आहे. या अतिक्रमानांना सरपंच, सदस्य व ग्रामसेवक पाठबळ देत असून गावठाणातील मोकळ्या जागा ठराव करून लोकांच्या नावावर करून आर्थिक मोबदला मिळवला आहे. त्यामुळे शासनाची व ग्रामस्थांची फसवणूक झाली असून 4 वर्षांपूर्वी वनवासवाडी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न देखील केला होता. त्यावेळी ग्रामपंचतीने मालकी हक्कपत्र मागविले होते मात्र त्यांना देता आले नाहीत. तसेच काही ग्रामस्थांच्या नावे ठराव करून जागा केली व परत एक वर्षाने रद्द ही केली. अशा प्रकारचे कृत्य ग्रामपंचायत करीत असून त्या विरोधात उपोषण करत असल्याचे मनोज लोखंडे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
चौकट-
ग्रामपंचायतीचे सदस्य स्वतः इस्टेट एजंट असल्यामुळे अनेक बेकायदेशीर ठराव करून शासकीय भूखंड लाटण्यात आला आहे. या सर्व प्रकरणांची स्वतंत्र चौकशीची मागणी केली होती. पण अद्याप न्याय मिळत नसून स्वतंत्र पंचायतीच्या स्तरावरच चौकशीचे प्रकरण अधिकाराचा वापर करून दाबले जात आहे. पंचायत सभापतींचे स्वीय सहायक खेडचे असल्यामुळे कोणतीही चौकशी होत नसल्याचा आरोप मनोज लोखंडे यांनी केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)