खेड ग्रामपंचायतीचा सावळा गोंधळ

File photo

दिवसाही स्ट्रीटलाईट सुरुच, विकासकामांची बोंब

सातारा-  जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये सातारा तालुक्‍यातील खेड ग्रामपंचायतीचा उल्लेख केला जातो. मात्र हा मोठेपणा केवळ नावापुरताच आहे की काय? असा प्रश्‍न उपस्थित राहू लागला आहे. सध्या ग्रामपंचायत हद्दीतील उभ्या असलेल्या विद्युत खांबावरील स्ट्रीटलाईट या सलग चार दिवसांपासून रात्री अन्‌ दिवसाही सुरु आहेत. या प्रकारावरुन ग्रामपंचायत प्रशासनाचा सुरु असलेला सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे.

-Ads-

महामार्गाला लागून असलेली खेड ग्रामपंचायत ही सातारा शहराचे उपनगर म्हणूनही ओळखली जाते. मात्र, याठिकाणी म्हणावा तेवढा विकास झालेला नाही. ग्रामपंचायत हद्दीत विकासकामांची बोंब सुरु आहे. विशेष म्हणजे खेड गावात प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या स्वागत कमानीवर बांधल्यापासून नावही टाकण्यात आलेले नव्हते. आणि आता चार दिवसांपासून गावातील विद्युत खांबावरील स्ट्रीट लाईट दिवसरात्र सुरुच आहे. या प्रकारावरुन सरपंच, उपसरपंच तसेच इतर सदस्यांच्या गावाच्या कारभाराकडे कितपत लक्ष आहे हे दिसून येत आहे. खेडमधील नागरिकांकडून वारंवार ही बाब निदर्शनास आणून देऊनही स्ट्रीटलाईट बंद करण्यात आल्या नसल्याचे येथील सूज्ञ नागरिकांकडून सांगितले जात आहे.

कर स्वरुपात ग्रामपंचायत नागरिकांकडून महसुल गोळा करत असते. मात्र, त्या प्रमाणात नागरिकांना रस्ते तसेच इतर सुविधा दिल्या जात नसल्याच्या तक्रारीही होत आहेत. सध्या दिवस रात्र सुरु असलेल्या रस्त्यावरील स्ट्रीट लाईटमुळे ग्रामपंचायतीच्या लाईटबिलात नक्कीच वाढ होणार आहे. दिवसाच्यावेळी लाईटची गरज नसतानाही स्ट्रीट लाईट चालू ठेवून ग्रामपंचायत प्रशासन झोपेतच असल्याचा प्रकार खेडमध्ये पहावयास मिळत आहेत.

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)