खेड्यातील महिला करणार ई-मेल, वापरणार इंटरनेट 

महिलांना डिजिटल साक्षर करण्यासाठी प्रशिक्षण केंद्रे 

मुंबई: महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील ग्रामीण भागांमधील महिला बचत गटांसाठी संयुक्तपणे चार नवीन डिजिटल साक्षरता केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. महापरिवर्तन हा महाराष्ट्राचा उपक्रम आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक विकासासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारीचा उपयोग करून घेण्यावर या उपक्रमातर्फे भर देण्यात येतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रशिक्षण घेतल्यानंतर लाभार्थी ई-मेल पाठवू शकतील, सोशल मीडियावरून जोडले जाऊ शकतील, ई-कॉमर्स वेबसाइटवरून खरेदी करू शकतील, ऑनलाइन बिले भरू शकतील, डिजिटल पेमेंट माध्यमांचा वापर करून व्यवहार करू शकतील, नकाशांचा वापर करू शकतील, हवामानाचा अंदाज घेऊ शकतील आणि आधार कार्ड, शिधावाटप पत्रिका, पॅनकार्ड आणि इतर सरकारी सेवांचा लाभ घेण्यासाठी इंटरनेट वापरू शकतील. आपल्या आर्थिक स्रोतांबद्दल माहितीपूर्ण आणि परिणामकारक निर्णय घेऊ शकतील, बाजारपेठांशी जोडले जाऊन आपले उद्योजकता कौशल्य वापरून आपली उत्पादने अधिक चांगल्या किमतीला विकू शकतील.

एचपीई आणि नासकॉम हे महाराष्ट्र शासनाच्या महापरिवर्तन उपक्रमासाठी मदत करणार आहेत. या योजनेनुसार काही जिल्ह्यात शिपिंग कंटेनर्स पोहोचविण्याच्या दृष्टीने काम करण्यात येईल. या कंटेनरचे परिवर्तन प्रशिक्षण वर्गांमध्ये करण्यात येईल. या वर्गांमध्ये खिडक्‍या, टेबल, कॉम्प्युटर, इंटरनेट, वातानुकूलित यंत्रणा, रेफ्रिजरेटर्स इत्यादी सुविधा असतील.
महिला आर्थिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान या उपक्रमांसाठी संबंधित महिला बचत गटांना प्रशिक्षण देणार आहेत.

या भागांतील महिला बचत गटांद्वारे तयार करण्यात येणारी उत्पादने उपयुक्त आहेत आणि स्थानिक पातळीवर, आजूबाजूच्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये त्यांची विक्री करण्यात येते. त्याचप्रमाणे डिजिटल व ऑफलाइन मार्गांचा वापर करून बाजारपेठेशी जोडणी विकसित करण्याबद्दल आणि त्यात सुधारणा करण्याबद्दलही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या हस्तक्षेपामुळे बचत गटांचे सबलीकरण होईल आणि त्यांच्या स्थानिक व्यवसायांसाठी विविध संधी उपलब्ध होतील.
आपल्या आजूबाजूच्या जगाशी जोडण्याच्या प्रत्येक घटकावर डिजिटल परिवर्तनाचा प्रभाव असतो. त्यामुळे डिजिटल साक्षरता हे आपल्या नागरिकांसाठी महत्त्वाचे कौशल्य आहे, असे एचपीई इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सोम सत्संगी म्हणाले. नासकॉम फाउंडेशनच्या भागीदारीने या डिजिटल वर्गांची सुरुवात हे महाराष्ट्र शासनाच्या महापरिवर्तन उपक्रमाला आम्ही दिलेल्या पाठिंब्याचे द्योतक आहे. आमच्या फ्युचर क्‍लासरूम कार्यक्रमासह ही डिजिटल साक्षरता केंद्रे स्थानिक महिला बचत गटांना महत्त्वाच्या कौशल्यांबाबत प्रशिक्षण देतील. या कौशल्यांचा वापर करून या महिला देशाच्या आर्थिक विकासात सक्रियपणे सहभागी होऊ शकतील.

दीर्घकालीन आणि एकात्मिक व्यासपीठ असलेल्या प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान या डिजिटल जागरुकता, प्रशिक्षण आणि क्षमता विकास कार्यक्रमाच्या डिजिटल साक्षरता आवश्‍यकतांची पूर्तता या प्रयत्नांमुळे होईल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)