खेडमधून पाच हजार शेतकऱ्यांचे अर्ज

आयुष प्रसाद : विभागीय आयुक्‍तांनी निवडणूक तयारीची घेतली माहिती

राजगुरूनगर- खेड तालुक्‍यात सुरू असलेल्या केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजना प्रभावीपणे राबविली जात आहे. एका दिवसांत सुमारे 5 हजार शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. जिल्ह्यात खेड तालुका आघाडीवर असून सुमारे 50 हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार असल्याची माहिती वरिष्ठ सहायक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
आगामी निवडणुकीच्या निवडणुकीच्या यंत्रणेच्या तयारीत पुणे जिल्ह्यात खेड तालुका अव्वल झाला आहे. आयुष प्रसाद यांनी विशेष मोहीम राबवत मतदार नोंदणी अभियान आणि तालुक्‍यातील मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी केलेले प्रयत्न याचा आज (रविवारी) आढावा घेण्यासाठी पुण्याचे विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी प्रसाद यांच्या कार्यालयाला भेट देवून माहिती घेतली, त्यावेळी प्रसाद यांनी ही माहिती दिली. यावेळी तहसीलदार सुचित्रा आमले-पाटील, नायब तहसीलदार लतादेवी वाजे, गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार, पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, संदीप येळे, पोलीस उपनिरीक्षक विक्रम गायकवाड, निवडणूक विभागाचे बाळासाहेब दाभाडे, अविनाश कुलकर्णी यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
आयुक्‍त म्हैसेकर यांनी प्रांत कार्यालयात उभारण्यात आलेल्या नियंत्रण कशाला भेट दिली, त्यानंतर मतदान डेमोला भेट दिली. येथे त्यांनी अधिकाऱ्यांना अधिकच्या सूचना दिल्या. मतदान मशिनच्या डेमोची पाहणी केली. तालुक्‍यात मतदान केंद्र आणि केंद्रावरच्या सुविधा, अडचणीची मतदान केंद्र, तालुक्‍यातील संवेदनशील मतदान केंद्र, त्यावर करण्यात येणारी उपाययोजना याबाबत आढावा घेतलाभ

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)