खेडमधील ग्रामपंचायतींत शिवसेनेचा बोलबाला

पक्षीय राजकारण बाजुला ठेवत अंतर्गत गटबाजीने निवडणूक चुरशीच्या

राजगुरूनगर- खेड तालुक्‍यातील सात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत यावेळी शिवसेनेने बाजी मारली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षीय बलाबल पहाता शिवसेना समर्थकांनी बाजी मारल्याने राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.
खेड तालुक्‍यात सात ग्रामपंचायतीसाठी रविवारी (दि. 24) मतदान झाले होते. गावपातळीवर निवडणूक होताना पक्षीय राजकारण बाजुला ठेवत अंतर्गत गटबाजीने निवडणूक चुरशीच्या झाल्या. सर्व मतदारांनी सरपंच निवडणूक दिल्याने सरपंचपदासाठी जोरदार लढती रंगल्या. सरपंचपदाच्या उमेदवारांची मतदारांसाठी तारेवरची कसरत करावी लागली. राजगुरुनगर येथे तालुका क्रीडा संकुलावर आज (सोमवारी) सकाळी 11 वाजता मतमोजणीला तहसीलदार सुचित्रा आमले, नायब तहसीलदार राजेश कानसकर, संजय गांधी नायब तहसीलदार एम. एल. धोत्रे यांच्या उपस्थितीत मतमोजणीला सुरुवात झाली. वॉंर्डनिहाय ईव्हीएमवर मतमोजणीला सुरुवात झाली. वॉंर्डनिहाय प्रतिनिधी उपस्थित राहिल्याने गोंधळ झाला नाही. सर्वत्र शांततेत मतमोजणी दुपारी एक वाजता संपली. जसजसे वॉंर्डनिहाय निकाल हाती येताच क्रीडा संकुलाबाहेरील आवारात समर्थक फटाके फोडून गुलाल भंडाऱ्याची उधळण करीत जल्लोष साजरा केला.
पाईट परीसरातील रौधंळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंपदी शिवसेनेचे खंदे समर्थक दत्तात्रय विठ्ठल रौधंळ यांनी 446 मते मिळवुन हनुमंत रौधंळ यांचा पराभव करत ग्रामपंचायतीवर निर्विवाद सत्ता मिळवली. सदस्य : शितल ओझरकर (बिनविरोध), अर्चना चोरघे, आशाबाई रौधंळ, कल्पना रौधंळ, भरत रौधंळ, नाना रौधंळ. निवडणुकीचे कामकाज मंडलाधिकारी राजेंद्र वाघ यांनी पाहिले.
चासकमान धरण परिसरात शिवसेनेचे समर्थकांनी बाजी मारली. अनुसुचित जमातीचे महिला सरपंचपद रिक्‍त राहिले. सदस्य : रघुनाथ खंडवे, यमुना बोरकर, नंदा बोंबले, शोभा जगताप, शंकर बोरकर, मीना बोरकर (बिनविरोध). अवघ्या एका जागेसाठी झालेल्या दुरंगी लढतीत सागर शेलार हे विजयी झाले.निवडणुकीचे कामकाज सर्कल हरिदास सोनवणे यांनी पाहिले.
आसखेड बुद्रुक : सरपंच : ताईबाई सप्रे यांनी मुकचंद गावडे यांचा 13 मतांनी पराभव करीत निवडून आल्या. जयश्री गाडे, सुभाष गाडे यांची बिनविरोध निवड झाली. तर पाच जागांसाठी झालेल्या दुरंगी लढतीत नवनाथ गावडे, आशा सोंडेकर, प्रमिला गाडे, संध्या तांबे, वनिता तांबे हे विजयी झाले. निवडणुकीचे कामकाज मंडलाधिकारी डी. एन. खोमणे यांनी काम पाहिले.
आंबेठाण ग्रामपंचायतीवर शिवसेनेनी बाजी मारली. सरपंच : संघमित्रा नाईकनवरे. सदस्य : दत्तात्रय मांडेकर, कल्पना मांडेकर, शांताराम चव्हाण, तुळशाबाई घाटे, अहिल्या पडवळ, दत्तात्रय नाईकनवरे हे विजयी ठरले. तर ज्ञानोबा दवणे, सारीका गावडे, रुपाली मांडेकर, लक्ष्मण भालेराव (बिनविरोध). निवडणुकीचे कामकाज मंडलाधिकारी नाना उगले यांनी पाहिले.
कडाची वाडी : महिला सरपंचपदी सुदंर लष्करे यांची बिनविरोध निवड झाली. सदस्य : महादेव बुचटे, राजाराम ठाकर, रुपाली खांडेभराड (बिनविरोध). पाच जागांसाठी दुरंगी-तिरंगी लढती अटीतटीच्या ठरल्या. यामध्ये प्रियंका कड, मनोहर खांडेभराड, निर्मला कड, मल्हारी कड, सपना कड हे विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पंचायत विस्तार अधिकारी जी. पी. शिंदे यांनी कामकाज केले.

  • गुळाणीत सामाजिक कार्यकर्त्यांना घरचा रस्ता
    दुष्काळ परीस्थितीशी नेहमीच उन्हाळ्यात पाणी टंचाईने त्रस्त ठरलेल्या श्रीक्षेत्र गुळाणी ग्रामपंचायतीत सरपंचपदाच्या सर्वसाधारण महिला राखीव क्षेत्रात दोन उद्योगपतींनी बाजी पणाला लावल्याने पाण्यासारखा पैसा खर्ची पडल्याची चर्चा रंगली होती. सरपंच : इंदुबाई ढेरंगे. अटीतटीच्या दुरंगी लढतीत सामाजिक कार्यात अग्रेसर ठरलेल्यांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला. या निवडणुकीत सर्जेराव पिगंळे, ताराबाई ढेरंगे, संदिप पिंगळे, मीना चव्हाण, शीतल वायाळ, महादू नरवडे, अनिता शिनगारे, आशा पिंगळे, अमोल तांबे विजयी झाले. निवडणुकीचे कामकाज सर्कल चेतन चासकर यांनी पाहिले.
  • वाशेरेत मोहिते समर्थकाचा पाच मतांनी पराभव
    वाशेरे ग्रामपंचायतीची राष्ट्रवादीचे दिलीप मोहिते समर्थक सरपंचपदाचे उमेदवार उल्हास कुडेकर यांचा अवघ्या पाच मतांनी पराभव करुन शिवसेनेचे संभाजी हरिभाऊ कुडेकर हे सरपंच म्हणून निवडून आले. तर ग्रामपंचायतीवर आपले समर्थक पॅनलचे सदस्य निवडून आणुन एकहाती सत्ता मिळवली. यात लक्ष्मी पानमंद (बिनविरोध), लहु चिमटे, सुनिता चिमटे, अनंता भोते, दत्तु हुरसाळे, विद्या तळपे, जयश्री कुडेकर, कैलास खंडे, भरत तरडे हे निवडून आले. निवडणुकीचे कामकाज सर्कल एस. एन. धर्माकाबंळे यांनी पाहिले.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)