खेडच्या स्वागत कमानीला मिळेना नाव

सातारा, दि. 2 (प्रतिनिधी) – वर्षभरापासून खेडच्या प्रवेशद्वारावर स्वागत कमान नव्याने बांधून तयार आहे. मात्र, अद्यापपर्यंत या कमानीवर नावच टाकण्यात आलेले नाही. त्यामुळे खेडला जाणाऱ्यांच्या संभ्रम होत आहेच. शिवाय स्वागत कमानीवर अद्यापपर्यंत नाव टाकण्यात आलेले नसल्याने नेमके कोणत्या कारणामुळे नाव टाकण्यात आलेले नाही? का स्वागतकमानीसाठी कुणा मोठ्या व्यक्तीच्या नावाचा शोध सुरु आहे की काय? असा प्रश्‍नही ग्रामस्थांपुढे उभा राहिला आहे.
गावागावांच्या प्रवेशद्वार स्वागत कमानी बांधल्या जात असून त्यावर गावांची नावे लिहिली जातात. जेणेकरुन लोकांच्या लक्षात यावे की हे नेमके कोणते गाव आहे. अशाच प्रकारे महामार्गाला लागून असलेल्या सातारा शहरानजीक खेड हे गाव आहे. मोठ्या संख्येचे असलेल्या या गावाच्या प्रवेशद्वार गत वर्षभरापूर्वी स्वागत कमान उभारण्यात आली आहे. मात्र, वर्षभरानंतरही या स्वागत कमानीला नाव मिळालेली नाही. स्वागत कमानीची पाटील कोरीच आहे. नेमके कोणत्या कारणामुळे या स्वागत कमानीला वर्षभरानंतरही नाव दिलेले नाही, असा संभ्रम आता येथील ग्रामस्थांमध्येही निर्माण झाला आहे. स्वागत कमानीला नाव नसल्यामुळे याठिकाणी येणाऱ्या नवख्या माणसाचीही फसगत होत आहे. बऱ्याचदा महामार्गावरील वाहतुकीच्या वर्दळीमुळे येथील ग्रामस्थांचीही फसगत होत असल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे संबंधितांनी तात्काळ या स्वागत कमानीला नाव द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)