खेडच्या दक्षिण भाग 100 टक्के बंद

चिंबळी – मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या बंदला खेड तालुक्‍यातील चिंबळी, कुरूळी परिसरातील व्यावसायिकांनी आपली दुकाने कडकडीत बंद ठेवल्याने बंदला शंभर टक्के पाठिंबा मिळाला. या बंदमुळे पुणे-नाशिक महामार्गावर वाहनांची तुरळक वर्दळ होती. महामार्गावर दिवसभर एक ही एसटी व पीएमपीएमएलची बस फिरकली नाही. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. तर औद्योगिक वसाहतीतील सर्व कंपन्या बंद होत्या. बंद दरम्यान मरकळ, सोळू, धानोरे, केळगाव, माजगाव येथे आळंदी पोलीस ठाण्याच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चिंबळी येथे आळंदी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार एन. पी. बनकर, चंद्रशेखर डुंबरे, रूपाली सोनावणे बंदोबस्तासाठी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)