खेडच्या दक्षिण भागात शिवजयंती उत्साहात

चिंबळी- खेड तालुक्‍याच्या दक्षिण भागातील चिंबळी, कुरूळी, मोई, निघोजे, केळगाव, मरकळ, सोळू, धानोरे, गोलेगाव परिसरातील जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत, विविध संस्थेच्या वतीने तिथी नुसार शिवजंयती साजरी करण्यात आली. कुरुळी येथे शिवतांडव ग्रुप, हिंद विजय ग्रुप व ग्रामस्थांच्या वतीने शिवनेरी किल्ल्यावरून ढोल ताशाच्या गजरात व शिवाजी महाराज की जय या घोषणा देत शिवज्योत आणून गावात मिरवणूक करण्यात आली. तर कार्यकर्त्यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला व पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तर उपस्थित मान्यवरांनी महाराजांच्या चारित्रावर पोवाडा व गाणी सादरीकरण करून मनोगत व्यक्‍त केले. याप्रसंगी परिसरातील सर्व मंडाळाचे कार्यकर्ते व आजी-माजी पदाधिकारी तसेच सर्व शिवभक्‍त उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)