खेडच्या दक्षिण भागात विविध कार्यक्रम उत्साहात

चिंबळी- खेडच्या दक्षिण भागातील मरकळ, केळगाव, सोळू, धानोरे, गोलेगाव, मोशी, चऱ्होली, डुडुळगाव येथील शाळा आणि ग्रामपंचायतीमध्ये आज (मंगळवारी) महात्मा गांधी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा गांधीनिमित्त मरकळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रभातफेरी काढून विद्यार्थ्यांच्या बालसभेचे आयोजन करण्यात आले होते. पहिले प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापिका अलका ओव्हाळ व सुनिता वाळुंज तसेच विद्यार्थी यांच्या हस्ते करून प्रत्येक वर्गातील दोन विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी यांच्या जीवन कार्याची माहिती दिली. तसेच ज्येष्ठ शिक्षक नामदेव गायकवाड यांनी देखील मनोगत व्यक्‍त केले. तद्नंतर आपली शाळा व गावातील महिला बचत गट, शिक्षक व विद्यार्थी यांनी स्वच्छ करून स्वच्छतेचा संदेश दिला. विनोद चव्हाण, प्रशांत आंधळे, प्रवीण माटे यांनी आभार मानून शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)