खेडच्या दक्षिण भागात मळणीची लगबग

चिंबळी- खेड तालुक्‍याच्या दक्षिण भागातील व औद्योगिक क्षेत्रात असलेल्या मरकळ परिसरात रब्बी हगांमातील ज्वारी, गहू व इतर धान्यांच्या मळणीची लगबग सुरू झाली आहे. यावर्षी ज्वारी, गहू, हरभरा आदि पिके घेण्यात आली आहेत. त्यामुळे प्रत्येक शेतकरी ट्रॅक्‍टरद्वरे मशिनच्या साह्याने मळणी करीत आहे. कुरूळी, चिंबळी, मोशी, मोई, केळगाव, सोळू, धानोरे, गोलेगाव, मरकळ भागात सोयबिन, भुईमूग, वाल, मूग आदि पिकांची काढणी करून गहू, ज्वारी, हरभरा पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणात केली जाते. या परिसरात गहू, ज्वारी पिकांची किमान दोन ते चार पाच एकरात पेरणी केली आहे. या पिकांच्या काढणीचे काम अंतिम टप्पात आले असून या भागात मळणी यंत्राला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. या वर्षी डिझेलचे भाव वाढल्याने गव्हाच्या एका पोत्यासाठी 300 तर ज्वारीच्या एका पोत्यासाठी 200 तर हरबरा एका पोत्यासाठी 350 रूपये दर मळणीसाठी घेतले जात असल्याचे शेतकरी वर्गाने सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)