खेडच्या तीन ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतमोजणी

राजगुरूनगर- खेड तालुक्‍यातील तीन ग्रामपंचायतीच्या सरपंचपद सदस्य निवडीसाठी रविवारी (दि. 24 ) तीन ग्रामपंचायतीसाठी सरासरी 85 टक्के मतदान झाले होते. मतमोजणी आज (सोमवारी) राजगुरुनगर येथे हुतात्मा राजगुरु क्रीडा संकुलात सकाळी 11 वाजता सुरू झाली. निवडणूक नायब तहसीलदार एम. एल. धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी शांततेत पार पडली. पोलीस उपनिरीक्षक विक्रम पडवळ यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

पाईट : सरपंच : मंगल विनाय भांगे (वॉर्ड चारमधून सदस्यपदासाठी देखील विजयी). सदस्य : जयश्री रौंधळ (बिनविरोध), अनुपमा गुरव, अश्‍विनी रौंधळ, महेश शेटे, अर्चना करंडे, सुनंदा कावडे, पूनम खेंगले, गुलाब खेंगले, रत्नमाला डांगले, कैलास सोनवणे, जयसिंग दरेकर, शारदा चोरगे. निवडणुकीचे कामकाज मंडलाधिकारी राजेंद्र वाघ यांनी पाहिले.

कोये : सरपंच : रामदास नामदेव राळे. सदस्य : काळुराम पारधी, योजना (बिनविरोध), रंगनाथ राळे, सुरेखा राळे, सुवर्णा महाले, सागर राळे, गोविंदा राळे, सारिका राळे तर एक पद रिक्‍त. निवडणुकीचे कामकाज मंडलाधिकारी हरिदास सोनवणे व ग्रामसेवक सुरेश घनवट यांनी पाहिले.

खालुंब्रे : सरपंच : सोनल अविनाश बोत्रे. सदस्य : सुरेखा खंडवे (बिनविरोध), देवराम तुळवे, संदीप येळवंडे, सुचिता बोत्रे, दिलीप पवार, सुप्रिया बोत्रे, चंद्रभागा बोत्रे, सुनिता पवार. निवडणुकीचे कामकाज मंडलाधिकारी एस. एम. तुर्रे व तलाठी व्ही. ऐ. रुपनवर व एस. बी. आचारी यांनी पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)