खेचरे येथे माजी विद्यार्थ्यांकडून वह्या वाटप

पिरंगुट – खेचरे (ता. मुळशी) येथील आप्पासाहेब ढमाले विद्यालयातील सन 1998 च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी एकत्र विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना वह्या आणि पुस्तके वाटप केली. माजी विद्यार्थी दुर्वेश धुमाळ, रवींद्र दारवटकर, ग्रामपंचायत सदस्य अशोक जोरी, रत्नदिप ढमाले, जितेंद्र ढमाले, सखाराम पवार, हेमलता शेंडगे, वंदना कंधारे, दिपाली पवार, सुनिता कुडले, शकुंतला कंधारे यांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी स्वामी भिष्माचार्य महाराज यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तक आणि वह्या वितरीत करण्यात आल्या. प्रास्ताविक मुख्याध्यापक अंकुश बोराडे यांनी केले. तर भाजपा युवा मोर्चाचे प्रचार आणि प्रसिद्धी विभागाचे जिल्हाध्यक्ष पप्पू कंधारे यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)