खूशखबर ! मान्सून अंदमानात दाखल

मुंबई : मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. पुढील 48 तासांत बंगालच्या उपसागरातील अन्य भागातही मान्सून धडकणार आहे.  मान्सून लवकरच केरळमध्ये पोहोचणार असल्याची माहितीदेखील हवामान विभागानं दिली आहे.

दरम्यान, 27 मे रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 28 मे रोजी कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 25 ते 28 मे दरम्यान विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

राजस्थानाचा काही भाग, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पश्चिम मध्य प्रदेश या परिसरातील काही भाग तसेच उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश आणि विदर्भातील एक ते दोन ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)