खूप घोरताय? तब्येत सांभाळा… 

डॉ. प्रसाद कर्णिक 

घोरणे हा विकार होण्यास प्रामुख्याने ही कारणे आहेत. हृदयविकाराचा त्रास असल्यास निद्राश्वसनरोधाचे प्रकार कोणते 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उपचारपद्धती :
घोरणे
अनेकांना झोपेत घोरण्याची सवय असते. झोपेत अशा घोरणाऱ्यांना आपण घोरतोय हे ठाऊकही नसते. झोपेत घोरण्याच्या या सवयीमुळे अनेक शारीरिक व्याधी निर्माण होऊ शकतात. निद्राश्वसनरोध म्हणजेच मस्लीप ऍनियाफ वेळीच ओळखायला हवा.

कुंभकर्णाची झोप ही गाढ व सुखी झोपेचा सर्वसाधारण मापदंड मानली जाते. म्हणूनच एखाद्या गाढ झोपणाऱ्या व्यक्तीला आपण कुंभकर्णासारखा झोपतो, असं सर्रास म्हणतो. अनेकदा अशा दीर्घकाळ झोपणाऱ्या व्यक्ती झोपेत घोरतही असतात. या घोरण्याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, या घोरण्याच्या विकाराकडे वेळीच लक्ष द्यायला हवे. कारण, त्यामुळे निर्माण होणारे आजार हे आयुष्य व्यापणारे, शारीर समस्यांना आमंत्रण देणारे असतात. त्यामुळे उच्चरक्तदाब, हृदयविकार, श्वसनरोध, पक्षाघात अशा अनेक व्याधी येऊ शकतात.

अनेकदा गाढ झोपेतील व्यक्तीला त्याच्या घोरण्याविषयी अथवा श्वास रोखला जाण्याची जाणीव नसते. मात्र, असे हे घोरणे त्यांच्या श्वसनमार्गावर ताण निर्माण करणारे असते. त्यामुळे, शरीराला प्राणवायूचा पुरवठा कमी होतो आणि हृदयाच्या कामावरही त्याचा प्रभाव पडतो. अनेकदा, त्यामुळे दिवसा दम लागणे, झोप पूर्ण होऊनही ती पूर्ण न झाल्यासारखे वाटणे, रक्तदाब वाढणे अशा अनेक समस्या येतात. त्यामुळे स्लीप ऍनिया म्हणजेच झोपेतील निद्राश्वसनरोधाविषयी दक्ष असणे अधिक गरजेचे आहे.

लक्षणे 
यात घोरण्यामुळे श्वास रोखला जातो.


दचकून जाग येते, पुन्हा वेगात श्वास सुरु होतो, या क्रियेत श्वसनमार्गावर भार येतो


झोपेतून उठल्यानंतर चिडचिड, अस्वस्थता, डोकेदुखी सुरु होणे


एकाग्रता कमी होणे, सतत लक्ष विचलित होणे


मूडमध्ये बदल होत राहणे, उदास, चिडचिडे व कंटाळवाणे वाटणे


झोपेतून वारंवार लघवीसाठी जाण्याची इच्छा होणे


जागे झाल्यानंतर घशास वा तोंडास कोरड पडणेलहान मुलांना जेव्हा हा त्रास होतो, तेव्हा मात्र ही लक्षणे वेगळी दिसतात- बिछाना ओला करणे


झोपेत खूप घाम येणे


सतत वाईट स्वप्ने पडणे


वेळीच सावध व्हा. लहान मुलांमध्ये वरीलपैकी एकही लक्षण आढळल्यास व कोणत्याही स्वरुपाचे घोरणे सतत ऐकू आल्यास निद्रातज्ज्ञांची मदत घेणे आवश्‍यक आहे.

 

हा विकार होण्यास प्रामुख्याने ही कारणे आहेत… 
अनियंत्रित वाढलेले वजन
आनुवांशिकता
महिलांपेक्षा पुरुषांमध्ये हे प्रमाण अधिक दिसते.
साठी उलटून गेल्यानंतर निद्राश्वसनरोध होण्याची शक्‍यता अधिक असते
पुरुषांमध्ये 17 इंचाहून अधिक तर स्त्रियांमध्ये 16 इंचाहून अधिक लठ्ठ असणारी मान
अतिधूम्रपान

हृदयविकाराचा त्रास 
असल्यास निद्राश्वसनरोधाचे प्रकार कोणते
अवरोधी श्वसन- यात श्वसनरोधाच्या एकूण बाधितांपैकी जवळपास निम्म्यांहून अधिक रुग्णांमध्ये हा प्रकार आढळतो. आनुवांशिकता, चुकीचा आहार, विश्रांतीच्या चुकीच्या सवयी ही प्रमुख कारणे त्यामागे असतात. यात श्वास रोखला जातो. घोरणे हे प्रमुख लक्षण असते.
केंद्रीय श्वसनरोध- घोरण्याच्या तक्रारीमध्ये एक टक्के रुग्णांमध्ये हा प्रकार असतो. यात श्वसनाचा प्रयत्नच केला जात नाही. मानवी मेंदू श्वसनाची क्रिया करण्याचा आदेश देण्यास जणू विसरतो.
श्वसनक्रिया केंद्रीय मज्जासंस्थेच्या अधीन असल्याने या प्रकाराला केंद्रीय श्वसनरोध म्हणतात-
मिश्र श्वसनरोध- वरील दोन्ही प्रकारचा त्रास रुग्णास होत असल्यास त्यास मिश्र श्वसनरोध म्हणतात. यात श्वसनप्रवाहात अडसर येतो.

उपचारपद्धती 
पॅप उपकरणांच्या माध्यमातून
मौखिक उपकरणातून उपचारपद्धती
कंठाच्या शस्त्रक्रिया

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)