खून प्रकरणात सात जणांना जन्मठेप

पुणे- किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एकाचा खून करणाऱ्या सात जणांना जन्मठेप आणि प्रत्येकी 16 हजार 500 रुपयांच्या दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावला आहे. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश ए. एस. भैसारे यांनी हा आदेश दिला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिने कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.
अरबाज फिरोज खान (28), इब्राहिम इस्माईल सय्यद (60), अस्लम उर्फ सॅन्डी इकरार अन्सारी (25), सलमान उर्फ बॉम्बे इब्राहीम सय्यद (28), सर्फराज उर्फ आठरा रशीद शेख, सद्दाम अब्दुल रशीद शेख (वय 21, वरील सर्व रा. कोंढवा खुर्द) आणि यासीर मजीद शेख (26, रा. अप्पर सुपर, बिबवेवाडी) अशी जन्मठेप झालेल्यांची नावे आहेत. इस्माईल शरीफ शेख (22, रा. नवाजिस पार्क, कोंढवा खुर्द) याच्या खून प्रकरणी जाहीद महंमद शेख (25, रा. भाग्योदयनगर, कोंढवा खुर्द) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. कोंढवा खुर्द येथील नाजीस पार्कवरील रोडवर 29 एप्रिल 2012 रोजी हा प्रकार घडला होता. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील जावेद खान यांनी काम पाहिले. त्यांनी 14 साक्षीदार तपासले. त्यामध्ये फिर्यादी आणि प्रत्यक्षदर्शीची साक्ष महत्त्वाची ठरली. घटनेच्या दिवशी फिर्यादी हे मयत इस्माईल यांच्यासोबत करिझ्मा दुचाकीवरून जात होता. त्यावेळी आरोपींनी आमच्याकडे पाहून रेस करतो का, अशी विचारणा इस्माई याला केली. याच कारणावरून त्यांच्यात वाद झाल्याने आरोपींनी कोयता, सत्तूर, तलवारीने वार करून आणि दगडाने मारून इस्माईल आणि फिर्यादींना मारहाण केली. घटनेनंतर मयत इस्माईल याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्‍टरांनी त्याला मयत घोषित केले. तर, फिर्यादीला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात इस्माईला 60 हून अधिक जखमा झाल्या. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी तपासणी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. ही घटना गंभीर स्वरुपाची आहे. आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी ऍड. खान यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने सात जणांना दोषी ठरवत विविध कलमानुसार शिक्षा सुनावली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)