खून प्रकरणात मोक्कानुसार पाच जणांना पोलीस कोठडी

पुणे – पूर्ववैमनस्यातून गोळी घालून आणि कोयत्याने वार करून खून केल्याप्रकरणात गोपाळ अंकुशराव टोळीतील पाच जणांना मोक्का लावण्यात आला आहे. त्या पाच जणांना न्यायालयात हजर केले असता 7 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायाधीश जे.टी.उत्पात यांनी दिला आहे.
अक्षय ऊर्फ बबलू ऊर्फ बळी धनंजय सुरवसे (वय 24, रा. सांगली), पुंडलिक शंकर वनारे (वय 33), मनोज शंकर शिरसीकर (वय 32), भक्तराज ज्ञानेश्‍वर धुमाळ (वय 26, तिघेही, रा. पंढरपूर, जि. सोलापूर) आणि बंडू ऊर्फ नितीन भारत बारंगुळे (वय 31, रा. गोपाळपूर, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) अशी पोलीस कोठडी झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणात टोळीप्रमुख गोपाळ बाजीराव अंकुशराव (वय 38, रा. आंबे, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) यांच्यासह आणखी तेरा जणांवर गुन्हा दाखल आहे. संदीप दिलीप पवार (वय 33, रा. पंढरपूर) असे खून झालेल्याचे नाव आहे. त्याची आई सुरेखा (वय 54) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ही घटना पंढरपूर येथील स्टेशन रस्त्यावर 18 मार्च रोजी दुपारी 1.10 च्या सुमारास घडली. अक्षय सुरवसे आणि मयत संदीप यांच्यात पूर्वी भांडणे झाली होती. घटनेच्या वेळी संदीप एका हॉटेलमध्ये मित्रांसह चहा पित बसला होता. त्यावेळी 6 ते 7 साथीदारांसह अक्षय तेथे गेला. संदीप याच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. त्यामध्ये संदीप याचा मृत्यू झाला. या प्रकरणात पाच जणांना मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी सर्वजण सराईत आहे. त्यांच्यावर पंढरपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. फरार साथीदारांच्या शोधासाठी, गुन्ह्यात वापरलेल्या तीन पिस्तुलांपैकी दोन जप्त करण्यात आले आहेत. उर्वरित एक हस्तगत करण्यासाठी आणि पिस्तुले कोठून आणली. याच्या शोधासाठी सर्वांना पोलीस कोठडी देण्याची मागणी विशेष सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने सर्वांना पोलीस कोठडी सुनावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)