पुणे- पूर्ववैमनस्यातून तलवारीने वार करून तरूणाचा खून आणि त्याच्या मित्राला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात दोघांच्या पोलीस कोठडीत 10 सप्टोबर पर्यंत वाढ करण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गजानन नंदनवार यांनी दिला.
खुस्त्रो हशम शेख (वय 19), जाफर अब्दुल अजीज सोनार (वय 23, दोघेही रा. येरवडा) अशी कोठडीत वाढ केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी यापूर्वी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. निहाल ऊर्फ गंड्या जनार्दन लोंढे (वय 19) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर राहूल सतिश कांबळे (वय 19) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत जनार्दन लोंढे यांनी फिर्याद दिली. ही घटना 22 ऑगस्ट 2018 रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.
निहाल आणि राहूल हे दोघे दुचाकीवरून जात होते. त्यावेळी त्यांना आडवून येरवडा परिसरातील पर्णकुटी चौक येथे आरोपींनी त्यांच्यावर तलवारीने वार करून निहाल याचा खून केला. तर राहूल याला गंभीर जखमी केले, असे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. या प्रकरणी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने शेख, सोनार या दोघांना न्यायालयात हजर केले. त्यावेळी दोघांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी सहायक सरकारी वकील वामन कोळी यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)