खून प्रकरणातील एकाचा जामीन फेटाळला

पुणे – डोक्‍यात दगड घालून खून केल्याप्रकरणात एकाचा जामीन न्यायालयाने फेटाळला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.एन.सलीम यांनी हा आदेश दिला आहे.
सुधीर श्रीमंत घुगे (वय 28, रा. आनंदनगर, सिंहगड रस्ता) असे जामीन फेटाळलेल्याचे नाव आहे. या प्रकरणात विशाल सेवकानंद वाघ (वय 35, रा. रायकरनगर, धायरी) आणि विकास विश्‍वनाथ पोकळे (वय 26, रा. धायरी) या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. अभिषेक बाळासाहेब पोकळे (वय 25, रा. धायरी) यांचा खून करण्यात आला होता. ही घटना 12 फेब्रुवारी 2018 रोजी रात्री 2.15 च्या सुमारास धायरी, गणेशनगर येथे घडली. अटक केलेल्या तिघांनी संगणमत करून विटा फेकून मारून पोकळे यांना जखमी केले. त्यामुळे ते जमिनीवर पडले. त्यावेळी तोंडावर आणि डोक्‍यात दगड घालून त्यांचा खून करण्यात आल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणात अटक केलेले तिघे न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यापैकी सुधीर याने जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जास अतिरिक्त सरकारी वकील जावेद खान यांनी विरोध केला. पूर्वी झालेल्या भांडणातून हा खून करण्यात आला आहे. सुधीर याच्यावर सिंहगड रोड पोलीस स्टेशमध्ये पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अद्याप दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. जामीन मिळाल्यस तो पुराव्यामध्ये ढवळाढवळ करण्याची शक्‍यता आहे, यासाठी त्याचा जामीन फेटाळावा, असा युक्तीवाद ऍड. खान यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)