खूनप्रकरणी भोसरी पोलिसांकडून चौघांना अटक

पिंपरी – दापोडी येथे रविवारी पहाटे कोयत्याने वार करत निर्घृण खून करण्यात आला. याप्रकरणी भोसरी पोलीसांनी चार आरोपींना अटक केली आहे.

अल्विन रवी राजगोपाल (वय-19, रा. कैलास जाधव चाळ, जयभीमनगर, दापोडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. क्‍लेरा रॉबर्ट किट्टो आणि पुष्पा राजगोपाल अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. क्‍लेरा रॉबर्ट किट्टो यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अभिषेक राजू चव्हाण (वय-26), रुपेश दिलीप संकपाळ (वय-20), राहुल वीर उर्फ पप्प्या (वय-20), सनी गजभीव (वय 20, सर्व रा. जयभीमनगर, दापोडी) या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असून निखील (पूर्ण नाव माहित नाही, वय-21) हा अद्याप फरार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रविवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास आरोपींनी आपसात संगनमत करून, पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून अल्विन रवी राजगोपाल यांच्यावर कोयत्याने डोक्‍यात वार केले. तसेच पेव्हिंग ब्लॉक आणि दगडाने मारहाण करून त्याचा खून केला. तसेच त्या सोडविण्यासाठी आलेल्या क्‍लेरा रॉबर्ट किट्टो आणि पुष्पा राजगोपाल यांनाही मारहाण करून जखमी केले. याबाबत अधिक तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)