खूटबाव विद्यालयात निबंध स्पर्धा

केडगाव- स्व. मंगलबाई मूथा प्रतिष्ठान केडगाव आणि एक मित्र एक वृक्ष संस्थेच्या वतीने शालेय मुलांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आलरी होती. यामध्ये दौंड आणि शिरूर तालुक्‍यातील 30 शाळा सहभागी झाल्या होत्या. तसेच सुमारे 3470 निबंध सादर झाले नुकताच प्राविण्य मिळवलेल्या मुलांना बक्षिसे देण्यात आली. खूटबाव विद्यालयात बक्षीस वितरण संपन्न झाले. यावेळी ऍड. आनंद चनोदीया, प्राचार्य राजेंद्र भोसले, हिंदूराव जाधव, बाबासाहेब सरतापे, सुगंधीलाल मूथा, जयदीप सोडनवर, वरवंड गावचे सरपंच संतोष कचरे, प्रशांत मूथा, डॉ. वल्लभ अवचट, विनय अग्रवाल उपस्थित होते. लहान गट ः नेहा विलास कुंभार, वरवंड विद्यालय (प्रथम), आविष्कार सोमनाथ बंड, जि. प. शाळा, देलवडी (द्विताय), इरफान लालमहंमद सय्यद (तृतीय), मोठा गट ः स्वाती राजेंद्र लोमटे, खूटबाव विद्यालय (प्रथम), गिरिजा जयसिंग मोहिते, खुटबाव विद्यालय (द्वितीय), प्राजल भानुदास बोत्रे, पारगाव विद्यालय (तृतीय) आदी स्पर्धक विजेते ठरले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)