खुशीचेही होणार बॉलीवूडमध्ये पदार्पण

स्टारकिड्‌मध्ये नुकतीच जान्हवी कपूर आणि सारा अली खान यांनी बॉलीवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री केली आहे. आता यापाठोपाठ श्रीदेवींची मुलगी आणि जान्हवीची छोटी बहीण खूशी कपूरही आता बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी तयार झाली आहे. करण जोहरने नुकतीच नेहा धुपियाच्या ‘नो फिल्टर नेहा’ या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी यंदा कोणते स्टारकिडस बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत, असा प्रश्‍न नेहाने विचारला असता करणने क्षणाचाही विलंब न करता खुशीचे नाव घेतले. यावरून एक लक्षात आले की आता बॉलीवूडमध्ये खुशीची एन्ट्री होणार आहे.

जावेद जाफरीचा मुलगा मिर्झान आणि खुशी या दोघांना घेऊन सिनेमा करणार असल्याचे करण जोहरने निश्‍चित तर केले. मात्र त्या सिनेमाचा तपशील मात्र दिला नाही. मिर्झान हा जावेद जाफरीप्रमाणेच उत्तम डान्सर आहे. तर खुशी ही देखील आईसारखीच एनर्जेटिक आणि क्‍युट आहे. खुशी आतापर्यंत फॅशन ट्रेन्डसाठीच ओळखली जात होती. बहिण जान्हवीबरोबर ती जिथे जिथे जायची तेथे आपल्या फॅशनसेन्समुळे तिच्याबाबत चर्चा व्हायची. या फॅशन सेन्समुळेच तिची क्रेझ सिनेफोटोग्राफर्समध्ये निर्माण झाली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

करण जोहरने आतापर्यंत ढिगभर स्टार किड्‌सना लॉंच केले आहे. अलिया भट, वरुण धवन, जान्हवी कपूर ही त्यापैकी काही ठळक उदाहरणे आहेत. सारा अली खानला त्याने “सिंबा’मधून पुन्हा पुढे आणले तर चंकी पांडेची कन्या अनन्या पांडेला “स्टुडंट ऑफ द इयर 2’मधून तो लॉंच करणार आहे. त्याने सतत स्टारकिड्‌सना प्रोत्साहन दिल्यामुळे त्याच्यावर वशिलेबाजी केल्याचा आरोपही झाला होता. पण त्यामुळे फिल्म इंडस्ट्रीचे काही नुकसान झाले नाही. उलट नवीन टॅलेंट प्रेक्षकांसमोर आले. खुशी कपूरही याच टॅलेंट हंटमधून प्रेक्षकांसमोर येण्यासाठी धडपडते आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)