जकार्ता: महिलांच्या 20 किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत भारताच्या गतस्पर्धेतील रौप्यविजेत्या खुशबीर कौरने निराशा केली. खुशबीरला एक तास 35 मिनिटे 24 सेकंद वेळ देता आली. तिने गेल्या स्पर्धेत एक तास 33 मिनिटे 07 सेकंद अशी कितीतरी सरस वेळ देत रौप्यपदक जिंकले होते. खुशबीरची सर्वोत्तम वैयक्‍तिक कामगिरी एक तास 31 मिनिटे 40 सेकंद अशी आहे. चीनच्या जिआयू यांगने एक तास 29 मिनिटे 15 सेकंद अशा स्पर्धाविक्रमासह सुवर्णपदक पटकावले.

चीनच्याच शिजी क्‍वियांगने एक तास 29 मिनिटे 15 सेकंदांत तिच्या पाठोपाठ स्पर्धा पूर्ण करीत रौप्यपदकाची निश्‍चिती केली. तर जपानच्या कुमिको अओकाडाने एक तास 34 मिनिटे 02 सेकंदांत कांस्यपदकाची कमाई केली. दरम्यान महिलांच्या शर्यतीतील आणखी एक भारतीय धावपटू बेबी सौम्या, तसेच पुरुषांच्या 20 कि.मी. चालण्याच्या शर्यतीतील के. टी. इरफान व मनीष रावत या भारतीय धावपटूंना नियमभंगाबद्दल स्पर्धेतून बाद करण्यात आले. “लॉस ऑफ कॉन्टॅक्‍ट’ या नियमाचा त्यांनी भंग केल्याचे पंचांना आढळून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)