संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली: स्कायमेटपाठोपाठ भारतीय हवामान विभाग अर्थात आयएमडीने बळीराजाला गुड न्यूज दिली आहे. यंदा सरासरी पाऊस राहील, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. यंदा सरासरीच्या 97 टक्के पाऊस पडेल, असं भाकीत आयएमडीने वर्तवलं.

भारतीय हवामान विभाग अर्थात आयएमडी यंदाच्या पावसाचा पहिला अंदाज वर्तवला. हवामान विभागाने पत्रकार परिषद घेऊन पाऊसमान कसा राहिल याबाबतची माहिती दिली. गेल्या वर्षी आयएमडीने 96 मिलीमीटर पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता. त्याप्रमाणे पाऊस 95 टक्के पडला.

यंदा देशभरात  समाधानकारक मान्सून राहील, असा पहिला अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. सध्याची परिस्थिती, समुद्राचं तापमान, वाऱ्याची गती यावरुन हा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. यंदा सरासरीच्या 100% पाऊस पडेल, असं स्कायमेटने म्हटलं आहे. महाराष्ट्रात तर उत्तम पाऊसमान असेल, असं स्कायमेटने नमूद केलं आहे.

मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या शहरात पाऊसमान सामान्य राहील.  इतकंच नाही तर मराठवाड्यातही यंदा चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. येत्या जून महिन्यात सर्वाधिक 111 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे, तर ऑगस्टमध्ये तुलनेने कमी म्हणजेच 96 टक्के पाऊस पडेल. विशेष म्हणजे दुष्काळाच्या परिस्थितीचा अंदाज शून्य टक्के म्हणजे काहीच नाही असा वर्तवण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)