खुशखबर! मान्सून केरळात दाखल

मुंबई : हवामान विभागाचा अंदाज तंतोतंत खरा ठरवत नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये आज डेरेदाखल झाला आहे. परिणामी मान्सूनचा प्रवास असाच विनाअडथळा पार पडला तर येत्या ७ दिवसात तो महाराष्ट्रालाही भिजवेल.

दरवर्षी मान्सून १ जूनला बंगालच्या उपसागरातून केरळात दाखल होतो. यंदा तीन दिवस आधीच मान्सूनचं आगमन झालं असल्याची माहिती हवामान विभागाने दिली. नेऋत्य मोसमी वारे आपल्यासोबत ढग आणतात आणि जूनपासून पुढचे चार महिने देशात पावसाळा ऋतू सुरू ठेवतात. १ जूनपर्यंत केरळमार्गे देशात दाखल होणारा मान्सून संपूर्ण देशात पसरण्यासाठी पुढील एक ते दीड महिना घेतो.

हवामान विभागाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात असं म्हटलंय की, आज नैऋत्य मोसमी पावसाने नैऋत्य अरबी समुद्र, कोमोरिन (मालदीवचा भाग), लक्षद्वीप, केरळातला बराचसा भाग आणि तामिळनाडूचा काही भाग तर बंगालच्या उपसागरातला काही भाग व्यापला. अशाप्रकारे आज केरळात मान्सून दाखल झाला. पुढील ३ ते ४ दिवसात केरळात मान्सून सर्वदूर पसरेल.

केरळनंतर कर्नाटक, गोवा पार करत सिंधुदुर्ग मार्गे मान्सून महाराष्ट्रात दाखल होतो. यंदाचा मान्सून समाधानकारक असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)