खुशखबर! पुणेकरांसाठी तीन हजार घरांची “लॉटरी’

या परिसरांत होणार घरे
“म्हाडा’ च्या योजनेत उभारली जाणारी ही घरे पुण्यातील नांदेड सिटी, येवलेवाडी, कात्रज, धानोरी तर पिंपरी-चिंचवड शहरातील रावेत, पुनावळे, वाकड, चऱ्होली, वडमुखवाडी, मोशी या परिसरातील हे प्रकल्प उभारले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

“म्हाडा’ची योजना : शनिवारपासून करता येणार अर्ज
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांत योजना

पुणे – “म्हाडा’ अर्थात महाराष्ट्र हाउसिंग ऍन्ड एरिया डेव्हलपमेंट ऍथॉरिटीने विविध उत्पन्न गटांतील नागरिकांसाठी पुणे व पिंपरी-चिंचवड येथील 3 हजार 139 सदनिका आणि 29 भूखंडांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर केली आहे. यासाठी नागरिकांना येत्या शनिवारपासून (दि.19) ऑनलाइन पध्दतीने अर्ज करता येणार आहे. तर घरांची सोडत ही 30 जून 2018 रोजी होणार आहे. या सोडतीमुळे नागरिकांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध होणार आहे.

केंद्र शासनाने 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे देण्याची योजना आखली आहे. यातून राज्य शासनाचा गृहनिर्माण विभाग हा नागरिकांना परवडणारी घरे स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. “म्हाडा’ पुणे विभागातर्फे अत्यल्प, अल्प, मध्यम व उच्च उत्पन्न गटातील नागरिकांसाठी या घरांची सोडत होणार आहे. यासाठी नागरिकांना म्हाडाच्या संकेतस्थळावर नोंदणी करावयाची आहे. नोंदणी प्रक्रिया येत्या शनिवारपासून (दि.19) दुपारी 12 वाजल्यानंतर सुरू होणार आहे. तर 18 जून 2018 पर्यंत नागरिकांना यासाठी ऑनलाइन पध्दतीने अर्ज करता येणार आहे.
म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर यांच्या मार्गदशनाखाली तसेच ओव्हर साईट कमिटीचे सदस्य माजी लोकायुक्त सुरेश कुमार व एनआयसीचे मोईज हुसेन यांच्या देखरेखे खाली ऑनलाइन लॉटरीचे कामकाज करण्यात येत असल्याची माहिती “म्हाडा’ पुणे विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी दिली.

“म्हाडा’ पुणे मंडळ एकाच वेळी 3 हजार घरांची लॉटरी काढून नवा इतिहास घडवत आहेत. मागील एक वर्षांपासून सुरू असलेल्या या कामाला आज मूर्त स्वरूप आले आहे. ऑनलाइन लॉटरी पध्दतीने या सदनिकांचे वाटप रितसर व नियमानुसार करीत आहोत. इतक्‍या मोठ्या प्रमाणात प्रथमच घरकुलांचे वाटप होत आहे. आर्थिकदृष्टया गरीब व गरजू नागरिकांची घरांची मागणी पूर्ण होणार आहे, अशी प्रतिक्रिया “म्हाडा’ पुणे विभागाचे सभापती समरजितसिंग घाटगे यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup:
1 :heart:
1 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)