खुशखबर ! पंढरपुरात लवकरच टोकन व्यवस्था

पंढरपूर : येत्या आषाढी यात्रेपूर्वी पंढरपुरातील वारकऱ्यांना रांगेशिवाय थेट विठ्ठलाचे दर्शन घेता येणार आहे. मंदिर समितीने त्रिलोक सिक्युरिटी सिस्टीम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीशी करार करुन ही व्यवस्था त्यांच्याकडे सोपवली आहे. आज झालेल्या मंदिर समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे आता येत्या काही दिवसात विठ्ठलाच्या दर्शनासाठी ताटकळत उभे राहावे लागणार नाही. म्हणजे आता 40-40 तास वाट पाहणे नाही, आंघोळी-पांघोळीविना ताटकळणं नाही, म्हाताऱ्या-कोताऱ्यांचे हाल नाहीत. विनामूल्य टोकन घ्यायचे त्यावर दिलेल्या वेळी मंदिरात जायचे आणि पांडुरंगाचे मनसोक्त दर्शन घ्यायचे.

-Ads-

तिरुपती, वैष्णोदेवी आणि शिर्डीमध्ये जशी सिस्टीम आहे ना अगदी तशीच व्यवस्था पंढरपूरमध्येही असणार आहे. त्रिलोक सिक्युरिटी सिस्टिम ही एजन्सी हे काम बघणार आहे. शहरात 30 ठिकाणी हे टोकन मिळतील. एका मिनिटात 45 भाविकांना दर्शन मिळणार. तर एका दिवसात 70 हजार भाविकांना विठ्ठलाचे दर्शन घेता येईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)