खुशखबर ! धरणसाठ्यात 44 टक्के पाणीसाठा

धरणक्षेत्रात संततधार, पाण्यासाठ्यात झपाट्याने वाढ

पुणे – शहर आणि जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणांच्या परिसरात गेले तीन ते चार दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने या पाणी-साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सध्या या चारही धरणांमध्ये मिळून सुमारे 44 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला धरणांतून पुणे शहराला तसेच जिल्ह्यातील विविध गावांना पाणी पुरवठा केला जातो. शहराच्या पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने महत्वाची अशी ही चार धरणे आहेत. त्यामुळे ही धरणे पुर्ण क्षमतेने भरणे महत्वाचे असते. त्यात पानशेत आणि वरसगाव ही धरणे मोठी आहे. त्याचबरोबर टेमघर आणि खडकवासला ही धरणे त्या तुलनेने कमी आहेत. गेले तीन ते चार दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने या धरणांतील पाणीसाठा वाढला आहे. वरसगाव धरणाच्या परिसरात दिवसभरात सुमारे 20 मिलिमीटर पाऊस पडला आहे. या धरणात 4.50 टीएमसी पाणी साठले आहे. पानशेत धरणाच्या क्षेत्रात सुमारे 60 मिलिमीटर पाऊस झाल्यामुळे पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या धरणातील पाणीसाठा आतापर्यंत 6.56 टीएमसी झाला आहे.

खडकवासला धरणाच्या क्षेत्रात तुलनेने कमी पाऊस झाला आहे. दिवसभरामध्ये 11 मिलिमीटर पाऊस झाल्याने या धरणात 0.96 टीएमसी पाणी झाले असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. टेमघर धरणाचे काम सुरू असल्याने या धरणात पाणी साठविण्यात येत नाही. तरीही, या धरणात 0.75 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. या परिसरात सुमारे 59 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. या चारही धरणांमध्ये मिळून सध्या 12.75 टीएमसी पाणी साठा जमा झाला आहे. पिंपरी चिंचवड परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाच्या परिसरात पावसाचे प्रमाण जास्त होते. दिवसभरात सुमारे 53 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

याशिवाय भोर, वेल्हे आणि आंबेगाव तालुक्‍यांतील धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे या धरणांच्या पाणीसाठ्यात सुद्धा वाढ होऊ लागली आहे. भिमा खोऱ्यातील कळमोडी धरण हे पुर्ण क्षमतेने भरले असून त्यातून विसर्गही सुरु झाला आहे. इतर धरणांमध्ये आंध्र हे धरण 94 टक्के भरले आहे. तर वडिवळे धरण हे सुमारे 75 टक्के भरले आहे. याशिवाय घोट नदी खोऱ्यातील येडगाव हे धरण सर्वाधिक म्हणजे 64 टक्के भरले आहे. त्याखालोखोल डिंभे धरण 49 टक्के भरले आहे. मुळा मुठा खोऱ्यातील पवना धरण हे 62 टक्के भरले आहे त्याचबरोबर या खोऱ्यातील कासारसाई या धरणामध्ये सर्वाधिक पाणीसाठा जमा झाले आहे. हे धरण 90 टक्के भरले आहे. याशिवाय मुळशी सुध्दा 51 टक्के भरले आहे. उजनी धरणामध्ये पाणी जमा होण्यास अद्याप सुरवात झालेली नाही पण भिमा खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जर असाच पाऊस आणखी काही दिवस राहिला तर नक्कीच उजनी मध्ये सुध्दा पाणी साठा जमा होण्यास सुरवात होईल सध्या हे धरणामध्ये उणे 9.67 धरण साठा आहे.

धरणाचे नाव टक्केवारी आजचा पाऊस टीएमसी

खडकवासला 47.70 11 0.96

पानशेत 61.55 60 6. 56

वरसगाव 35.07 59 4.50

टेमघर 20.30 46 0.75

पवना 63.68 18 5.42

मुळशी 52.60 20 9.71

भाटघर 37.34 32 8.77

उजनी -7.96 – -4.27

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)