खुशखबर…! उन्हाळ्यात विमान प्रवास भाड्यात ९ टक्क्यांची घसरण

चेन्नई : विमान प्रवास करणाऱ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. यंदा उन्हाळ्यात देशांतर्गत विमान प्रवास ४ ते ९ टक्क्यांनी स्वस्त झाला आहे. ट्रॅव्हल अ‍ॅग्रीगेटर संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, हवाई तिकिटांच्या मागणीत २0 टक्के वाढ झाली असतानाही भाड्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत घसरण झाली आहे.

हवाई प्रवास भाड्यात गेल्या वर्षीच्या या काळाच्या तुलनेत ५ टक्के घसरण झाली आहे. केवळ दिल्ली-मुंबई क्षेत्रातील हवाई प्रवास भाडे १२ टक्क्यांनी वाढले आहे. एप्रिल ते जून या काळात हवाई प्रवास भाडे ९ टक्क्यांनी कमी झाले आहे. आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास भाड्यातही सरासरी १९ टक्के घसरण झाली आहे.

यात्रा डॉट कॉमचे सीओओ शरद धल्ल यांनी सांगितले की, विमान कंपन्यांची अतिरिक्त क्षमता आणि कमालीची स्पर्धा यामुळे हवाई भाड्याचे दर घसरले आहेत. याशिवाय सध्या तेलाच्या किमतीही स्थिर असल्यामुळे विमान कंपन्यांच्या खर्चात बचत झाली आहे. धल्ल यांनी सांगितले की, मुंबई व दिल्ली या हवाई वाहतुकीच्या दरात मात्र वाढ झाली आहे. विमानतळांवरील धावपट्ट्या बंद असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक महागली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)