खुशखबर…! अवघ्या दोन हजारात करा परदेश वारी

नवी दिल्ली : जर तुम्ही परदेशात फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमचा हा प्लॅन आता फक्त दोन हजार रुपयांत पूर्ण होऊ शकणार आहे. एअर एशिया या विमान कंपनीने ही ऑफर आणली आहे. एवढेच, नाही तर देशात सुद्धा हवाई सफर करण्यासाठी 849 रुपये मोजावे लागणार आहेत. या ऑफरमध्ये 26 मार्च ते 1 एप्रिलच्या दरम्यान तिकीट बुकिंग करताना येणार आहे.

विदेशात विमान प्रवास करायचा असेल तर सुरुवातील 1999 रुपये लागणार आहेत आणि स्थानिक म्हणजेच देशांतर्गत प्रवासासाठी 849 रुपये खर्च करावे लागणार आहेत. या ऑफरचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला एअरलाइनच्या वेबसाइटवर तिकीट बुकिंग करावे लागणार आहे. तसेच, एअरलाइनच्या अॅपवरुन या ऑफरची बुकिंग करता येणार नाही.  या ऑफरमध्ये 26 मार्च ते 1 एप्रिलच्या दरम्यान तिकीट बुकिंग केल्यास तुम्हाला पुढील सात महिन्यानंतरची तारीख प्रवास करण्यासाठी निवडावी लागणार आहे.

या ऑफरच्या माध्यमातून देशांतर्गत बंगऴुरु, रांची, जयपूर, भुवनेश्वर, विशाखापट्टनम, नागपूर, इंदोर, कोची, हैदराबाद पुणे, गुवाहाटी, चेन्नई आणि कोलकाता या शहरांमध्ये विमान प्रवार करता येणार आहे. तसेच, विदेशात कुआलालंपुर बॅकॉंक, मेलबर्न यासह अन्य काही ठिकाणी प्रवास करता येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)