खुल्या वर्गातील गरिबांसाठी आरक्षण हे मोदी सरकारचे क्रांतिकारक पाऊल

माधव भंडारी यांचे मत सबका साथ,सबका विकास या धोरणाचा भाग

कराड –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने खुल्या वर्गातील गरिबांना नोकरी व शिक्षणामध्ये दहा टक्के आरक्षण देण्यासाठी कायदा करण्यासाठी उचलेले पाऊल हे देशातील सामाजिक न्यायासाठीचे ऐतिहासिक क्रांतिकारक व पुरोगामी पाऊल असल्याचे मत भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

येथील शासकिय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, एकनाथ बागडी यांचेसह प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती होती. भंडारी म्हणाले, मोदी सरकारने आर्थिक आधारावर दहा टक्के आरक्षण ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्‍चन, शिख, जैन अशा सर्व धर्म पंथातील गरिबांना शिक्षण आणि रोजगारांच्या संधी मिळणार आहेत. जात, धर्म, पंथ असा कोणताही भेदभाव न करता सर्वांना प्रगतीची संधी उपलब्ध करुन देणारा मोदी सरकारचा हा निर्णय सबका साथ, सबका विकास या धोरणाच्या अंमलबजावणीचा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ते पुढे म्हणाले, समाजातील सर्व वंचित घटकांना विकासाची संधी उपलब्ध करुन देण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे आघाडी सरकार वचनबध्द आहे. मोदी सरकारने कोणताही भेदभाव न करता सर्वांना बॅंक खाते, गॅस कनेक्‍शन, शौचालये, वीज पुरवठा, आरोग्य सेवा यासाठी यशस्वीरित्या काम केले आहे. आता आर्थिक आधारावर आरक्षण लागू करुन सरकारने गरिबांचा विकास करण्यासाठी अधिक संधी निर्माण केली आहे. अनुसूचित जाती-जमाती व इतर मागासवर्गीयांचा आरक्षण आहे. इतर समाज घटकांमधील गरिबांनाही अशा प्रकारे विकासाची संधी मिळाली पाहिजे. अशी अनेक वर्षाची मागणी आहे.

या मागणीला केंद्रीय मंत्री रामदास आठवले व रामविलास पासवान यांच्या सारख्या अनुसूचित जातीमधील महत्वाच्या नेत्यांनीही पाठिंबा दिला आहे. आर्थिक आधारावर आरक्षणाची गेली 70 वर्षे असलेली मागणी पूर्ण करण्याचे ऐतिहासिक काम मोदी सरकारने केले आहे. हे आरक्षण सर्व कसोट्यांवर टिकेल, याची सरकार काळजी घेईलच. सर्व राजकिय पक्षांनी या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आणि सामाजिक सलोखा टिकविण्यासाठी सहकार्य करावे, असेही आवाहन प्रवक्ते भंडारी यांनी पत्रकार परिषदेत केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)